gold silver price today


मंगळवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi commodity exchange) सोने दरात काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सोन्याचा (gold silver price today) एप्रिलचा फ्यूचर ट्रेड 58 रुपयांच्या तेजीसह 46,959 रुपयांवर होता. तर चांदीचा मार्चचा फ्यूचर ट्रेड 140 रुपयांच्या वाढीसह 70,572 रुपयांवर पोहचला. सोने दरात काहीसा बदल झाला आहे, मात्र चांदीच्या भाव पुन्हा एकदा 70 हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे.

आतंरराष्ट्रीय बाजारातही सोने दरात तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेत सोन्याचा दर 2.15 डॉलरच्या वाढीसह 1,813.54 डॉलर प्रति औंस इतका आहे. तर चांदीच्या दरात 0.15 डॉलरने घसरण झाली आहे.

---------------------------------
Must Read

1) कोल्हापुरात रात्रीची संचारबंदी? वाचा काय म्हणाले पालकमंत्री सतेज पाटील

2) इचलकरंजीकरांसाठी आणखी एक चिंतेची बातमी...!!

3) बिनधास्त राहू नका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

---------------------------------

दिल्लीत 23 फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर -

>> 22 कॅरेट गोल्ड रेट - 45410 रुपये

>> 24 कॅरेट सोन्याचा भाव - 49530 रुपये

>> चांदीचा दर - 70500 रुपये

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या (gold silver price today) दरात 278 रुपयांची वाढ झाली. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा रेट 46,013 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदीचा रेट 265 रुपयांनी वाढून 68,587 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे.

आतापर्यंत 10 हजार रुपयांनी स्वस्त झालं सोनं - 

गेल्या वर्षाच्या (Multi commodity exchange)  तुलनेत 2021 मध्ये सोन्याचा दर 10 हजार रुपयांनी घसरला आहे. कोरोना काळात सोन्याचा दर 55 हजारांवर पोहचला होता. कोरोना वॅक्सिन आल्यामुळे सोन्याचा दर कमी झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. कोरोना काळात शेअर मार्केटमध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं. त्यामुळे अनेक गुंतवणुकदारांचा सोन्याच्या गुंतवणुकीकडे मोठा कल होता. या काळात सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जात होतं. त्यामुळे सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर पोहचला होता. परंतु कोरोना लसीच्या घोषणेनंतर बाजारात तेजी आल्याने, सध्या सोन्याचा दर उच्चांकी स्तरावरून जवळपास 10 हजारांनी कमी झाला आहे.