ऑनलाइन टिम :
इचलकरंजी येथील नाट्यगृह परिसरात कोरोनाचे तीन व बीजेपी मार्केट परिसरात एक रुग्ण आढळून आल्याने हे दोन्ही परिसर कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) करण्यात आले आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करुन आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, कर्नाटक राज्यातून शहरात दाखल होणार्या सर्वच एसटीची नदीवेस नाका येथे तपासणी केली जात होती.गतवर्षी जून महिन्यापासून इचलकरंजी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र बनले होते.
परंतु प्रशासनाच्यावतीने केलेल्या विविध उपाययोजना आणि नागरिकांच्या सहकार्याने इचलकरंजी महिन्याभरापूर्वी म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये कोरोनामुक्त झाली होती. मात्र गत काही दिवसांपासून शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून सध्या शहरात 5 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामध्ये श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह परिसरात एकाच घरातील तिघांचा तर बीजेपी मार्केटमध्ये एकाचा समावेश आहे. नाट्यगृह परिसरातील एकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्याच घरात रविवारी लग्नसोहळा पार पडला. त्याच घरातील नवरी मुलगी तसेच तिची आत्या या दोघींचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे.
----------------------------------Must Read
1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम
3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले
------------------------------------
नगरपरिषद प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रुग्ण आढळून आलेला परिसर कंटेनमेंट झोन (Containment zone) केला असून पत्रे मारुन भागातील रस्ते बंद केले आहेत.दरम्यान, कोरोनाचा (Covide-19) प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शासन निर्देशांचे पालन केले जात असून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणार्या, सोशल डिस्टनसिंग न पाळणार्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून सोमवारी दिवसभरात 13 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.