weapons


crime news- इचलकरंजी परिसरातील कबनूर-रुई रस्त्यावर तलवार आणि चाकू (weapons) घेऊन फिरत असलेल्या दोघांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मोहंमदशादाब राजू मुल्ला (वय २१ रा. तिरंगा कॉलनी कबनूर) व अक्षय राजू चव्हाण (रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश कांबळे यांनी फिर्याद दिली.

आहे. याबाबत कबनूर-रुई रोडवर दोघेजण हातात तलवार व चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता अक्षय चव्हाण हा तलवार (weaponsटाकून पळून गेला होता. तर मोहमदशादाब मुल्ला याला चाकूसह अटक करण्यात आली आहे. मंगळवारी फरारी अक्षय चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक प्रमोद मगर करीत आहेत. (crime news)

------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------