prakash awadelocal news- कोरोना महामारी लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलात (electricity bill) 100 युनिटपर्यंत त्याचबरोबर यंत्रमाग व्यवसाय व लघु उद्योगांसाठी 1 रुपयाची सवलत आणि  सौरऊर्जेसाठी शेतकर्‍यांना 50 टक्के सबसिडी मिळावी आदी मागण्यांसाठी ताराराणी पक्षाच्यावतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली आज 8 फेब्रुवारी रोजी येथील महावितरण कार्यालयावर भव्य मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ झाला आहे. 

मार्च 2020 पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे संपूर्ण उद्योग, व्यवसाय, कंपन्या बंद पडल्याने लाखोंचा रोजगार गेला. त्यामुळे सर्वांवरच आर्थिक अरिष्ट कोसळले. या लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलात (electricity bill) 100 युनिटपर्यंत सवलत द्यावी, यंत्रमाग आणि लघुउद्योगांना 1 रुपयाची सवलत मिळावी, शेतीला अखंडीत वीज पुरवठा होत नसल्याने सौरऊर्जा योजना अंतर्गत यांना 50 टक्के सबसिडी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी ताराराणी पक्षातर्फे आज भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे.------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------

ताराराणी पक्ष कार्यालयापासून सकाळी 10 पासून रॅलीला सुरुवात झाली आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन स्टेशन रोडवरील महावितरण कंपनी असा रॅली चा मार्ग आहे. त्याठिकाणी महावितरणच्या अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येईल. या रॅलीमध्ये सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांसह यंत्रमागधारक, लघुउद्योजक, शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी केले आहे.