ichalkaranji electionइचलकरंजी येथील पालिकेच्या प्रभाग 5 (अ) साठी पोटनिवडणूक (election) लवकरच जाहीर होणार आहे. या प्रभागातील मतदार यादी अद्ययावत करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे या प्रभागातील इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. एप्रिलमध्ये या प्रभागातील पोट निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. 

नगरसेविका श्रीमती शोभा कांबळे यांच्या निधाननंतर ही जागा रिक्त झाली आहे. यापूर्वीच पालिका प्रशासनाकडून एकूण तीन जागांसाठी पोट निवडणूक घेण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी वरील एका जागेसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने एका आदेशाद्वारे दिला आहे. 

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

श्रीमती कांबळे या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. पालिकेची सार्वत्रिक निवडणूक या वर्षाअखेरीस होणार आहे. अत्यंत कमी कालावधी असल्यामुळे या पोट निवडणुकीबाबत फारशी ईर्ष्या असणार नाही. कदाचित बिनविरोध करण्याचाही प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. 

राज्यातील पोट निवडणुकीचा धडाका 

राज्यात पालिकेच्या विविध कारणास्तव रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणूक (election) होणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात रावेर व फैजपूर या पालिकांची हद्दवाढ झाल्यामुळे, तर 29 पालिकांतील विविध कारणास्तव रिक्त झालेल्या जागांवर पोट निवडणूक होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी आणि शिरोळ पालिकेच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोट निवडणूक होणार आहे. 


मतदार याद्या अद्ययावत कार्यक्रम असा 

1) प्रारूप मतदार यादी जाहीर करणे - 15 फेब्रुवारी 

2) हरकती व सूचना दाखल करणे - 22 फेब्रुवारीपर्यंत 

3) अंतिम मतदार यादी जाहीर करणे - 1 मार्च 

4) मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे - 8 मार्च