आमदार पी. एन. पाटील आणि आमदार प्रकाश आवाडे एकत्र !


राजकारणात (politics) कोणच कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. त्याची प्रचिती आता जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. एकेकाळी काँग्रेस पक्षांतर्गत कट्टर राजकीय शत्रू असलेले आ. पी. एन. पाटील आणि आ. प्रकाश आवाडे हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या (election) निमित्ताने एकत्र येत आहेत.

जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी अध्यक्षपदासाठी पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना ताराराणी आघाडीचा पाठिंबा असल्याचे सांगत मनोमीलनाच्या द़ृष्टीने पहिले पाऊल टाकले. राहुल पाटील अध्यक्ष होतील किंवा नाही, हे पुढील राजकीय घडामोडींवर ठरेल; पण आवाडे यांच्या भूमिकेमुळे पी. एन. पाटील आणि प्रकाश आवाडे यांच्यातील राजकीय (politics)  वैरत्व कमी होण्याची शक्यता आहे.त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------

जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून पी. एन. पाटील आणि प्रकाश आवाडे गट आमने-सामने आले होते. इतकेच नव्हे, तर दोन्ही गटांत हाणामारीही झाली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये जिल्हा काँग्रेस आणि इचलकरंजी शहर काँग्रेस अशी सरळसरळ अलिखित विभागणी झाली होती. दरम्यानच्या काळात काँग्रेस पक्षांतर्गत नेतृत्व बदल झाले आणि प्रकाश आवाडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीमध्ये तत्कालीन आ. सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आवाडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असली, तरी पक्षांतर्गत नेत्यांमधील दरी कमी झाली नव्हती. दरम्यान, विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसपासून फारकत घेत अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. विजयी झाल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला; पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर जिल्ह्यातील राजकारणाची फेरमांडणी झाली.

'गोकुळ'मध्येही आवाडे साथ देणार?

पालकमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या मदतीने 'गोकुळ'मध्ये सत्तांत्तर घडविण्याचा चंग बांधला आहे. त्यातच 'गोकुळ'चा सत्ताधारी गटही अभेद्य राहिलेला नाही. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी 'गोकुळ'मध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आगामी वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'गोकुळ'मध्ये सत्ताधार्‍यांविरोधात मोट बांधण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. त्यामध्ये त्यांना शिवसेना खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर यांचीही साथ असेल. अशा स्थितीत सत्ताधार्‍यांसाठी एक-एक ठराव लाखमोलाचा ठरणार आहे. 'गोकुळ'मध्ये सत्ताधारी गट आ. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरा जात आहे. अशावेळी आ. आवाडे यांची मिळालेली साथ पाटील यांना फायदेशीर ठरू शकते.