ichalkaranjiचार्टर्ड अकौंटंटस् कोर्सच्या फाऊंडेशन व इंटरमिडिएट (course) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सीए फाऊंडेशन परीक्षेत इचलकरंजीच्या निधी दिनेशकुमार ललवाणी यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला. देशभरातून परीक्षेला बसलेल्या 78 हजार विद्यार्थ्यांमधून त्यांनी 400 पैकी 361 गुण मिळवत हे यश संपादन केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडियातर्फे वर्षातून दोन वेळा या परीक्षा घेतल्या जातात. गतवर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या फाऊंडेशन परीक्षेस कोल्हापुरातून 500 विद्यार्थी व इंटरमिडिएट (courseपरीक्षेस 420 विद्यार्थी बसले होते. कोल्हापूर विभागातून इंटरमिडिएटमध्ये सिद्धांत मेहता (प्रथम क्रमांक), हर्षिल शाह (द्वितीय), कल्पेश पाटील (तृतीय क्रमांक), श्रेयस दळवी, सागर पटेल यांनी चौथा क्रमांक मिळविला आहे.
---------------------------------

Must Read

1) आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली आज भव्य मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ

2) ...अन्यथा कोल्हापूरचा वणवा राज्यभर पेटेल

3) Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हे' फंडे वापराल तर नकाराचं टेंशन विसराल....

---------------------------------


दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया शाखा कोल्हापूर, इचलकरंजीचे सीए अनिल चिकोडी, सीए तुषार अंतूरकर, सीए विजय दुधाळकर, सीए नितीन लाढा, सीए शहंशाह मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.डी.के.टी.ई. संस्थेच्या इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या निधी लालवाणी विद्यार्थिनी आहेत. याच संस्थेचे लखन रांदड व खुशी पारख पहिल्या 50 मध्ये गुणवत्ता यादीत आले आहेत.