Ichalkaranji-fire-state-art-loom-factoryऑनलाइन टिम :

इचलकरंजी : येथील जुना चंदूर रोडवरील अत्याधुनिक यंत्रमाग (Loom) कारखान्यात शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये ६ अत्याधुनिक यंत्रमाग, सुताचे बिम, कापड यासह अन्य साहित्य जळून सुमारे साठ लाखांचे नुकसान झाले. स्थानिक युवक आणि अग्निशामक (Firefighter) दलाच्या जवानांच्या 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.

जुना चंदूर रोडवर अरुण बाहेती यांचा प्रियालक्ष्मी टेकस्टाइल निंबार्क मिल्स प्रा. लि. नामक अत्याधुनिक यंत्रमागाचा (Loom) कारखाना आहे. या कारखान्यातील उत्तर बाजूच्या लूमला १६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा शॉर्टसर्किटने आग लागली. कारखान्यातील  (factory)  सुताचे बिम व कापड यामुळे बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने कामगारांनी आरडाओरडा सुरू केला. 

----------------------------

याची माहिती नगरपालिकेच्या अग्निशामक  (Firefighter) दलाला मिळताच २ पाण्याचे बंब आणि रुग्णवाहिकेसह ते घटनास्थळी दाखल झाले. धुराच्या लोटामुळे आणि भागातील वीजपुरवठा खंडित केल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे कारखान्याच्या (factory) छतावर चढून पत्रे फोडून धुराला वाट करून देण्यात आली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले.