crime new
 crime news- कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर जैनापूर (ता. शिरोळ) येथील एकाने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहेत. २७ जानेवारी रोजी दुपारी घडलेली घटना अज्ञाताने दिलेल्या माहितीमुळे व चाईल्ड लाईन कोल्हापूर या संस्थेच्या कार्यकत्या मुळे उघडकीस आली आहे. भाऊसो शितगोंडा पाटील (वय ४७) असे संशयिताचे नांव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्यावर बलात्कार (rape)व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी, कबनूर (ता. हातकणंगले) परिसरात राहणाऱ्या पिडीत मुलीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी घरात कोणीही नसल्याचे पाहून भाऊसो पाटील याने घरात शिरुन मुलीवर अत्याचार केला. शेजारील एक वृध्दा मुलीचा आवाज ऐकून घरी आल्याने भाऊसो पाटील याने तेथून पलायन केले. 

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक


२७ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेसंदर्भात एका अज्ञाताने टोल फ्री क्रमांकावरुन सांगली मिशन संचलित चाईल्ड लाईन या संस्थेला माहिती दिली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाईल्ड लाईनच्या स्वयंसेविका तेजस्विनी मदने, सदस्य ओंकार कुर्ले, जिल्हा बाल संरक्षण समितीचे महेंद्र कांबळे आदींनी मुलीचा पत्ता शोधून काढत घटनेची खात्री केली. पिडीत मुलगी व तिची आई दोघीही परगांवी असल्याने त्यांना भेटून धीर दिला व पोलिसात तक्रार देण्यास परावृत्त केले. संबंधित मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिसात रात्री उशीरा तक्रार दिली असून त्यानुसार पोलिसांनी भाऊसो पाटील याच्यावर  (rape)बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पिंगळे यांनी दिली.