hiccups causes

उचकी लागणे (hiccups causes) ही सामान्य समस्या असली तरी आपोआप बंद होणारी ही उचकी काही वेळा खुपच त्रासदायक ठरते. जेव्हा शरीरात डायफ्राम आकुंचित होतो, तेव्हा उचकीची समस्या होते. डायफ्राम एक मांसपेशी असते, जी छातीला पोटापासून वेगळे करते. हे श्वास घेण्याचे प्रक्रियेत महत्वाची भूमिका निभावते. फुफ्फुसात हवा भरण्यासाठी डायफ्राम आकुंचित होणे आवश्यक असते. डायफ्राम वारंवार आकुंचन पावल्याने फुफ्फुसे वेगाने हवा आत घेतात.

उचकी येण्याची कारणे

जोराने हसणे, मसालेदार पदार्थ खाणे, घाईघाईत खाणे किंवा पोट फुगल्याने होते. जास्त खाल्ल्याने सुद्धा उचकी लागते. जास्त खाल्ल्याने पोट पसरते आणि पोट पसरल्याने अ‍ॅसिड अन्ननलिकेत जाते, ज्यामुळे डायाफ्राममध्ये जळजळ होते.

-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

उचकी थांबवण्याचे उपाय (hiccups causes)

1 थोड्यावेळासाठी श्वास रोखणे

थोड्या वेळासाठी श्वास रोखणे हा यावर सोपा उपाय आहे. दिर्घ श्वास घ्या आणि काही सेकंद श्वास रोखा, नंतर हळुहळु सोडा.

2 बर्फाचे पाणी मारणे किंवा थंड पाणी पिणे

उचकी बंद करण्यासाठी एखादा छोटा बर्फाचा तुकडा तोंडात टाकून चोखा. किंवा थोडे थंड पाणी पिऊ शकता.

3 जीभ बाहेरच्या बाजूला खेचा

आपली जीभ बाहेरच्या बाजूला खेचू शकता. परंतु जास्त जोर लावू नका, अन्यथा वेगळीच समस्या होऊ शकते.

4 घाबरणे

असे मानले जाते की, अचानक घाबरल्याने उचकी राखण्यास मदत होते.

5 जोरात हसणे

असे मानले जाते की, जोरात हसल्याने उचकीपासून मुक्ती मिळू शकते. उचकी येत असेल तर जोराने हसा.