करोना काळ आव्हानात्मक होता. यामुळे आरोग्याचं महत्त्व पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झालं आहे. त्यामुळे सर्वजण आता स्वतःच्या आरोग्याबद्दल (importance of health) अधिक जागरूक झालेले दिसून येतात. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि योग्य प्रमाणात चालणं आवश्यक आहे. दररोज दहा हजार पावलं चालणं गरजेचं असल्याचं ऐकतो. पण या आकड्याला काही शास्त्रीय आधार आहे का? हे जाणून घेऊ या...
खरं तर हा एका मार्केटिंग रणनीतिमुळे घडलेला प्रकार आहे. १९६५ मध्ये एका जपानी कंपनीनं पावलं मोजण्याचं यंत्र बाजारात आणलं होतं. त्याचं नाव मॅनपो कीइ. याचा जपानी भाषेतील अर्थ दहा हजार पावलांचं यंत्र असा होतो. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आय-मिन ली यांनी अशी माहिती दिली. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार त्या काळी दहा हजार पावलं चालल्याचे फायदे कोणत्याही संशोधनाअंती समोर आलेले नव्हते. ली यांनी १६ हजार वयस्कर अमेरिकन महिलांच्या चालण्याच्या सवयीचा अभ्यास केला. दररोज ४४०० पावलं चालणाऱ्या महिलांचा मृत्यूदर हा त्यापेक्षा कमी चालणाऱ्या महिलांपेक्षा कमी आढळून आला आहे. ७,५०० पावलांच्या पुढे चालल्यास त्याचा काही फायदा नसल्याचं निरीक्षणसुद्धा नोंदवण्यात आलं आहे.
----------------------------
Must Read
1) आजचे राशीभाविष बुधवार ,17 फेब्रुवारी २०२१..!!
2) वस्त्रनगरीतील गुन्हेगारीपुढेपोलिस हतबल..?
3) कोल्हापूर : किणी टोल नाक्यावर फास्टॅगसाठी वाहनांच्या रांगा
किती चालावं?
टेक्सास विद्यापीठानं केलेल्या संशोधनानुसार दररोज पाच हजार पावलांपेक्षा कमी चालल्यास शरीराची फॅट्स (importance of health) पचवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मधुमेह किंवा हृदयाशी निगडित आजार होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे हा आकडा तुम्ही संदर्भ म्हणून घेऊ शकता.
इतर मार्ग कोणते?
चालणं हा व्यायामाचा एक प्रकार आहे. पण तो अवलंबणे सर्वांना शक्य असेलच असं नाही. त्यामुळे जर तुमच्या परिसरात चालण्यासाठी गार्डन किंवा सायकलिंगसाठी रस्ते नसतील किंवा स्विमिंग पूल नसेल तर तुम्ही शरीराची जास्तीत जास्त हालचाल करण्यावर भर द्यायला हवा.