Skin Care TipsSkin Care Tips- दिवसभराच्या कामामुळे तुम्ही खूप थकले आहेत, पण लगेचच एखादी मीटिंग किंवा कार्यक्रमासाठी छान आणि सुंदर पद्धतीने तयार होऊन जायचे असेल तर गोंधळून जाऊ नका. यावर एक सोपा आणि स्वस्त नैसर्गिक उपाय करून पाहा. आपण साखरेशी संबंधित सोप्या ब्युटी टिप्स (Sugar and Coffee Scrub) जाणून घेणार आहोत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा उपाय केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळेल. विशेष म्हणजे यासाठी अधिकचा खर्च देखील करावा लागणार नाही.

स्क्रब तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

एका वाटीमध्ये एक चमचा साखर घेतल्यानंतर त्यामध्ये कॉफी पावडर (Sugar and Coffee Scrub) आणि एक चमचा गुलाब पाणी मिक्स करा. तिन्ही सामग्री नीट एकजीव करून घ्या. चेहऱ्यावर पेस्ट लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करावे.

तुमची त्वचा कोरडी झाली असल्यास या मिश्रणामध्ये अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल मिक्स करू शकता. यामुळे त्वचा रुक्षपणा दूर होण्यास मदत मिळेल.

------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------

​कसा करावा उपयोग?

मिश्रण तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर लावा. पाच ते सहा मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. चेहरा पुसल्यानंतर टोनर लावा.

टोनरऐवजी आपण गुलाब पाण्याचाही (Rose Water) उपयोग करू शकता. यानंतर त्वचेवर मॉइश्चराइझर देखील लावा. तुमची त्वचा तेलकट असल्यास वॉटर बेस्ड मॉइश्चराइझरचा उपयोग करावा. तर त्वचा कोरडी असणाऱ्यांनी ऑइल बेस्ड मॉइश्चराइझर वापरावे.

​त्वचेवर लावा क्रीम

हा उपाय केल्यानंतर तुमच्या त्वचेवरील निस्तेज आणि रुक्षपणा दूर होण्यास मदत मिळेल. थोड्या वेळानं तुम्ही रोजच्या वापरातील किंवा डॉक्टरांनी सुचवलेली क्रीम लावून कार्यक्रमासाठी तयार होऊ शकता. हा नैसर्गिक उपाय करण्यासाठी केवळ १० मिनिटे लागतात.

साखरेमुळे आपली त्वचा नैसर्गिक स्वरुपात एक्सफोलिएट होते. तर कॉफीतील नैसर्गिक घटकांमुळे त्वचेवरील मृत पेशींची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

​त्वचेवर अशा प्रकारे कार्य करते हे मिश्रण

कॉफी, साखर आणि गुलाब पाण्याचे मिश्रण (Sugar and Coffee Scrub) आपल्या त्वचेवरील निस्तेजपणा दूर करण्यासाठी एखाद्या टॉनिक प्रमाणे कार्य करते. कॉफीमुळे त्वचेतील पेशींमधील रक्तप्रवाह वाढतो तर साखरेमुळे त्वचेला ग्लुकोजचा पुरवठा होतो.

अशा प्रकारे कॉफी आणि साखरेमुळे आपल्या त्वचेमध्ये ऊर्जेचा प्रवाह जलदगतीने वाढतो. तसंच गुलाब पाण्यामुळे आपल्या त्वचेला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि त्वचेवरील मृत पेशींची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.