CPR hospital in kolhapur


local news- हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील रुग्णालयात (hospital) रुग्णाला वैधता संपलेले सलाईन (saline) लावल्याचा धक्कादायक असा प्रकार रात्री उघडकीस आला. याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.(hospital in kolhapur)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेठ वडगाव येथे राहणारे महादेव खंदारे (७५) यांना शुक्रवारी सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना डिसेंबर २०२० हे वैधता संपलेले सलाइन लावल्याचा प्रकार त्यांचा मुलगा अक्षय खंदारे याच्या नजरेस आला. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांसोबत हुज्जत घातली.

-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

या सलाइनने तुमचा रुग्ण दगावला का? असा उलटा प्रश्न विचारात खंदारे यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न रुग्णालयाने (hospital) केला. याबाबत वरिष्ठ अधिकऱ्यांकडे तक्रार केली असता त्याची दखल घेण्यात आली नाही. या सलाइनमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास दूधगंगा इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील डॉक्टर जबाबदार असतील, असे या अर्जात सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालयातील बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.