hina khan troll on internetऑनलाइन टिम:

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हिना खान. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’पासून ते ‘बिग बॉस’पर्यंत प्रवास करणाऱ्या या अभिनेत्रीची तरुणाईमध्ये विशेष क्रेझ आहे. अभिनयासोबतच हिना तिच्या फॅशनसेन्स आणि लूकमुळे कायम चर्चेत असते. मात्र, यावेळी हिना तिच्या लूकमुळेच ट्रोल (internet troll) व्हावं लागलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली हिना खान अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एका फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर (photo on instagram) केले. मात्र, तिचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे.

----------------------------

Must Read

-------------------------------

हिनाने काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये हे फोटोशूट (photo on instagram) केलं असून सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली आहे. “प्रसिद्धी मिळावण्यासाठी लोक काहीही करतात”, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, ”तू या कपड्यांपेक्षा पंजाबी ड्रेसमध्ये जास्त सुंदर दिसतेस”, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तसंच “इस्लाम धर्माचा अपमान करु नकोस”, असंही काही युजर्सने म्हटलं (internet troll) आहे.

हिना खान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. तसंच ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांमध्येदेखील तिचं नाव होतं.