sushant singh rajput


अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (sushant singh rajput) दोन बहिणींविरोधात अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या एफआयआरवर आज न्यायालयात सुनावणी (court hearing) पार पाडली. न्यायालयाने मितू सिंहला दिलासा दिला आहे तर, सुशांतची दुसरी बहिण प्रियांकावरील एफआयआर (complaint) कायम ठेवला आहे.

सुशांतच्या मृत्यूमागे रियाचा हात असल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुशांतला त्याच्या दोन बहिणींनी अवैधरित्या डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन पुरवले आणि त्यातूनच सुशांतविषयी अघटित घडले असावे, असा आरोप करत रियाने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रियाने आम्हाला लक्ष्य करण्यासाठी कुहेतूने एफआयआर नोंदवला, असा दावा करत एफआयआर रद्द करण्याच्या विनंतीची याचिका दोन्ही बहिणींनी कोर्टात केली होती.

---------------------------

वांद्रे पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करावा, अशी विनंती करणाऱ्या प्रियांका व मीतू सिंह यांच्या फौजदारी रिट याचिकेवर आज न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मीतू सिंहविरोधातील एफआयआर (complaint) रद्द केला आहे. तर, प्रियांका सिंहविरोधातील एफआयआर कायम ठेवला आहे. रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या आरोपात प्रामुख्याने प्रियांकाविरोधात आरोप आहेत, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं (court hearing) आहे.

मीतू सिंहप्रमाणेच प्रियांका सिंहवरील एफआयआर रद्द व्हावा यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी माहिती प्रियांकाचे वकील माधव थोरात यांनी दिली आहे.

अखेर सत्याचा विजय

प्रियांका सिंहविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे दिसत आहे, असे निरीक्षण नोंदवून मुंबई हायकोर्टाने तिची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे सत्यासाठी लढत असलेल्या रिया चक्रवर्तीला दिलासाच मिळाला आहे. अखेर सत्याचाच विजय होतो. हायकोर्टाच्या निर्णयाने आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.