बरेच लोक उरलेले अन्न दुसर्‍या दिवशी गरम करून खातात. आरोग्य तज्ज्ञ (Health expert) म्हणतात की काही शिळ्या गोष्टी खाण्याने आपण आजारी पडू शकता आणि ते पदार्थ तुम्ही ताजे असतानाच खाल्ले पाहिजे. ते कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही शिळे खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते त्याबाबत जाणून घेऊया.

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------

अंडी

डॉक्टर कांता शेळके यांनी रीडर डायजेस्टला सांगितले की, ‘अंड्यांमध्ये सर्वाधिक साल्मोनेला असतो.’ साल्मोनेला हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे जो कच्च्या किंवा अर्धवट शिजवलेल्या अंड्यात आढळतो. यामुळे ताप, पोटाचा त्रास किंवा डायरिया सारख्या समस्या उद्भवू शकतात. बरेच लोक अंडी कमी उष्णतेवर शिजवतात ज्यामुळे त्यातील जीवाणू पूर्णपणे मरत नाहीत आणि शिळे झाल्यावर ते दुप्पट होतात.

बटाटा

डॉ. शेळके यांच्या म्हणण्यानुसार, बटाटा शिजवल्यानंतर बराच काळ थंड राहिल्यास त्यात क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाचे जीवाणू वाढतात. या जीवाणूंमुळे बोटुलिझम आजार होऊ शकतो. ज्यामध्ये अंधुक दिसणे, तोंड कोरडे पडणे आणि श्वास घेण्यास अडचण होणे यासारखे लक्षणे दिसतात. हा आजार सामान्यतः मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. बटाट्याला कधीच मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करू नये.

पालक

पालकात मोठ्या प्रमाणात नायट्रेट असते जे शिजवल्यावर कार्सिनोजेनिक नायट्रोसामाइन्समध्ये बदलते. म्हणून, शिळे पालक पुन्हा गरम करून खाणे टाळावे. आरोग्य तज्ज्ञ पालकास कच्चे किंवा हलके शिजवून खाण्याची शिफारस करतात. नायट्रेट्स असलेले कोणतेही पदार्थ जास्त प्रमाणात शिजवून खाऊ नयेत.

उरलेला भात

शिजवलेला तांदूळ अर्थात भात बर्‍याच काळासाठी रूम टेम्प्रेचरवर ठेवल्यामुळे त्यामध्ये बॅसिलस सेरियस बॅक्टेरिया वाढू लागतात. त्यामुळे उरलेला शिळा भात खाल्ल्याने अन्न विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंग होऊ शकते. भात बनवल्यानंतर काही तासात त्यास खाणे कधीही चांगले.

चिकन

कच्च्या अंडीप्रमाणे कच्च्या कोंबडीमध्येही साल्मोनेला बॅक्टेरिया असतात आणि बराच काळ ठेवल्याने हे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. हे टाळण्यासाठी प्रथम कोंबडीचे मांस चांगले शिजू द्यावे. मायक्रोवेव्ह केवळ कोंबडीचे मांस गरम करते, त्यास इतक्या चांगल्या प्रकारे शिजवत नाही की त्याचे जीवाणू पूर्णपणे नष्ट होतील.

कोल्ड प्रेस ऑईल फूड

फ्लॅक्स सीड ऑईल, ऑलिव्ह ऑईल, कॅनोला ऑईल आणि इतर सीड ऑईलमध्ये ओमेगा -3 फॅट आणि इतर अनसॅच्युरेटेड फॅट आढळतात. ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत, परंतु यांच्यापासून बनविलेले अन्न शिळे ठेवल्याने आणि वारंवार तापवल्याने ते हानिकारक ठरू शकतात.

तेलकट पदार्थ

तेलकट पदार्थ गरम केल्याने त्यांच्यात हानिकारक रसायने तयार होतात जे आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. जर तुम्हाला ते खायचेच असतील तर एकतर ते गरम न करताच खावे किंवा मंद आचेवर गरम करावे.

सीफूड

खराब सीफूड खाद्य खाल्ल्यास अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की उच्च तापमानात वारंवार सीफूड गरम केल्याने त्यात बॅक्टेरिया उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. सीफूड दोन तासांपेक्षा जास्त काळ फ्रीझच्या बाहेर ठेवू नये.