throat infectionhealth tips- बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. गरम गोष्टींची जागा थंड गोष्टी घेत आहेत. या हंगामात सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे घश्याचा. या दिवसांत थंड पाणी, कोल्ड ड्रिंक आणि थंड गोष्टींमुळे घश्याचा त्रास होणे सामान्य आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि घश्यात वेदना (throat infection) जाणवणे किंवा घसा खवखवणे अश्या समस्या असतात. अश्या परिस्थिती जर अन्नाची काळजी घेतली नाही तर समस्या आणखी वाढू शकते. यासाठी काही देशी उपाय आहेत, ज्याच्या मदतीने आपण या त्रासातून मुक्त होऊ शकता.

हळदीचे गरम दूध :

झोपेच्या वेळी हळदीचे गरम दूध प्या. हळदमध्ये संसर्ग दूर करण्याची क्षमता असते, ज्यामुळे घशातील संक्रमण बरे होण्यास मदत होते.

---------------------------------
Must Read

1) कोल्हापुरात रात्रीची संचारबंदी? वाचा काय म्हणाले पालकमंत्री सतेज पाटील

2) इचलकरंजीकरांसाठी आणखी एक चिंतेची बातमी...!!

3) बिनधास्त राहू नका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

---------------------------------

काळी मिरी आणि तुळस.

एक कप पाण्यात 4 ते 5 काळी मिरी आणि तुळसची 5 पाने उकळून काढा बनवा आणि प्या. जर तुम्ही रात्री हा काढा घेतला तर तुम्हाला फायदा होईल. काळी मिरी आणि तुळस औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे घशातील संक्रमण बरे करण्यास उपयुक्त आहे. (health tips)

लसूण :

लसूणमध्ये बॅक्टेरियाविरोधी घटक असतात, त्यामुळे घश्यातील संक्रमण दूर करण्यात मदत होते. लसणाची कळी थोडा वेळ आपल्या दातात ठेवा. त्याचा रस चोखल्याने घशात आराम मिळेल.

कोमट पाण्याने गुळणा :

जर घसा खवखवत असेल तर कोमट पाण्यात मीठ घाला आणि गुळणा करा. यामुळे घसा खवखवण्यापासून (throat infection) आराम मिळतो आणि घश्याचा संसर्गही बरा होतो. कोमट पाण्यात मीठ मिसळणे घश्यावर चांगला उपचार आहे.

मध :

घसा खवखवण्यापासून मुक्त होण्यासाठी मध खा. मधात सूज आणि जळजळ कमी करणारे गुणधर्म असतात. या उपायाने घश्याला आराम मिळेल.