headaches causesऑनलाइन टिम:

health guide- डोकेदुखी (headaches causes) ही एक सामान्य समस्या आहे, जी बहुतेक लोकांना त्रास देत असते. उत्तम प्रकारे निरोगी असूनही, बर्‍याचवेणा लोकांना डोकेदुखीचे कारण अजिबात समजत नाही. आपल्या डोक्याला कशामुळे आणि कोणत्या कारणामुणे वेदना होत आहे? हेच कळत नाही ना ? पण, याकडे दुर्लंक्ष करू नका. डोकेदुखीची कारणे वेगवेगळी असू शकतात.

डोळ्यांमुळे हि होतेय डोकेदुखी

बर्‍याच वेळा काहीतरी लक्षपूर्वक नजरेने पाहिल्यामुळे देखील डोकेदुखी होत असते. ज्या लोकांची डोळे तीक्ष्ण आहेत, त्यांना जवळपासची वस्तू अस्पष्टता दिसते आणि दूरची वस्तू स्पष्ट दिसते. अशावेळी हे लोक जवळची वस्त स्पष्ट दिसावी म्हणून अधिक जोर देऊन पाहतात. त्यामुळे डोळ्यावर ताण देऊन पाहणे डोकेदुखीस कारणीभूत ठरते. काही लोकांमध्ये, ही समस्या जन्मत:च असते. परंतु सहसा ही समस्या 40 वर्षांनंतर येते. त्यामुळे आपणाला असे काही वाटत असेल तर आपण आपल्या डोळ्यांची चाचणी डॉक्टरांकडून करून घ्यावी.

मान आणि खांदाचा येणारा ताण

बरेच लोक कित्येक तास संगणकावर बसून काम करत असतात. तसेच अशावेळी फोनवर बोलताना मान फोन कानाशी धरून मान वाकडी करून बोलतात. यामुळे स्नायूंमध्ये तणाव निर्माण होतो, ज्यामुळे डोकेदुखी सुरू होते. अशा प्रकारच्या डोकेदुखीमध्ये कोमट पाण्याने आंघोळ केल्याने आणि वार्मिंग पॅडमुळे आराम मिळतो. ध्यान आणि व्यायामामुळे शरीराचा ताणही कमी होतो.

-----------------------------

Must Read

बर्‍याचवेळ भूक रोखल्यामुळे होतेय डोकेदुखी

बर्‍याच वेळेस भूक लागल्यावरही लवकर खात नाहीत. त्यामुळे त्यांना डोकेदुखी (headaches causes) होऊ लागते. भूक लागल्यामुळे रक्तातील साखर कमी होते, ज्यामुळे डोकेदुखी उद्भवते. जर भुकेमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आपण थोड्या वेळाने खाल्ले पाहिजे.

सकाळी कॉफी न पिल्यामुळे होते डोकेदुखी

जर तुम्ही दररोज सकाळी कॉफी (coffee) पीत असाल. आणि एक दिवस तुम्ही कॉफी न प्याला तर तुम्हाला डोकेदुखी देखील होऊ शकते. दररोज कॉफी प्यायल्यामुळे शरीरात चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्याची सवय होते. जेव्हा हे द्राव्य शरीरात जात नाही तेव्हा डोकेदुखी सुरू होते. जर आपल्याला कॅफिन सोडायचे असेल तर ही कामे एका झटक्यात बंद करू नका. कॉफी हळूहळू कमी करा. आपण कॉफीऐवजी ग्रीन किंवा ब्लॅक टी देखील पिऊ शकता.

जास्त मद्यपान केल्यामुळे होते डोकेदुखी

हँगओव्हरमुळे डोकेदुखी देखील होते. अल्कोहोलमुळे झोप पूर्ण होत नाही. हँगओव्हरमुळे बर्‍याच लोकांना खूप थकवा येते आणि मळमळ जाणवते. 5 ते 8 पॅगमध्ये पुरुषांना हँगओव्हर होते तर, स्त्रियांना 3 ते 5 पेये घेतल्याने. म्हणून जास्त मद्यपान करू नका.

आईस्क्रीममुळे होतेय डोकेदुखी

आईस्क्रीम खाल्ल्यानेही डोकेदुखी होऊ शकते. जेव्हा आपण थंड पदार्थ त्वरीत खातो त्यावेळी तोंडाच्या पेशी संकुचित होतात. ज्यामुळे डोकेदुखी सुरू होते. तथापि, डोकेदुखीचा हा प्रकार सामान्य आहे आणि याचे काही मिनिटांत निराकरण होते. मात्र, कोणतेही थंड पदार्थ हळूहळू खावे.

कानात होणारा संसर्ग

बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे (virus) कानात संक्रमण होते आणि यामुळे डोकेदुखी सुरू होते. जर आपल्या कानात द्रव किंवा पू तयार होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा. सामान्य कान संक्रमण एक किंवा दोन आठवड्यांत आपोआप निराकरण होत असते.

चुकीच्या पध्दतीने कुशीवर झोपणे

रात्री चुकीच्या पध्दतीने कुशीवर झोपल्यामुळे डोकेदुखी होते. जर आपल्याला झोपेत कोणत्याही प्रकारचे त्रास होत असेल आणि आपले डोके दुखत असेल तर, आपली झोप पूर्ण होत नाही. अशावेळी आपले डोके व मान सरळ ठेऊन झोपण्याचा प्रयत्न करावा.