hcl technologies



technology- एचसीएल टेक्नॉलॉजीजने (hcl technologies) तिच्या नागपूरमधील मिहान येथील प्रकल्पात एक हजार नवे कर्मचारी घेण्याचे ठरवले आहे. ही नोकरभरती महिन्याभरात पूर्ण होईल. यामध्ये अननुभवी व अनुभवी असे दोन्ही व्यावसायिक घेतले जाणार आहेत. या एक हजार पदांसाठी कॉलेजांतून नुकतेच शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्यांनाही संधी उपलब्ध (recruitment) होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मिहानमध्ये एचसीएलचा ५० एकर जागेतील प्रकल्प एप्रिल २०१८ पासून दोन हजार कर्मचाऱ्यांसह कार्यान्वित आहे. हे केंद्र आता अमेरिकेच्या ग्रीन बिल्डिंग कौन्सिलद्वारे जगभरातील प्लॅटिनम प्रमाणित प्रकल्पाच्या 'एलिट लीग'चा भाग आहे. या प्रकल्पात अभियांत्रिकी, अनुसंधान व विकास सेवा (ईआरएस) आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवा व्यवसाय विकसित केले जातात. 

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

याखेरीज एचसीएल नागपूरतर्फे 'कम बॅक होम' ही मोहीम राबवली जात असून या अंतर्गत नागपुरातील आयटी तज्ज्ञांना त्यांच्या घरी परत बोलवून ईआरएस, अॅप्लिकेशन आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवेमध्ये करियर (recruitment)  घडवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. तसेच 'स्टे रूटेड' ही मोहीम कंपनी पदवीधरांसाठी राबवत असून त्यांच्या स्वतःच्या शहरात जागतिक पातळीवर संधी निर्माण करण्यावर याअंतर्गत भर दिला जात आहे. दोन वर्षांपासून २० वर्षांपर्यंतच्या अनुभवी व इच्छुक आयटी व्यावसायिकांनी recruit.nagpur@hcl.com वर अर्ज करावा, असे आवाहन एचसीएल टेक्नॉलॉजीजने केले आहे.