मुंबईमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिला अभिनेत्रीची छेड (harassments) काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित अभिनेत्री हॉटेलमध्ये एका वेब सीरीजच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने राहत होती. तिचं दिवसभरातील चित्रीकरण संपवून वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली असताना ही घटना घडल्याचं समजतंय.
दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचं वृत्त पीटीआयने दिलं असून याप्रकरणी रविवारी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याविरोधात मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्री हॉटेलच्या ३७ व्या मजल्यावरील एका वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी पीडित गेली होती.
--------------------------
1) पोलिओ लसीकरणावेळी हलगर्जी, सॅनिटायजर पाजल्याने यवतमाळमध्ये 12 चिमुकले रुग्णालयात
2) Budget 2021 : आजच्या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळालं? वाचा ठळक मुद्दे
3) सीतारामन यांनी त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांचीच फसवणूक केली – चिदंबरम
------------------------------
या प्रकरणी रविवारी अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्थानकात विनयभंगासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अजून चौकशी सुरू आहे.