Video Viral


Video Viral- लग्न समारंभात सगळेच मजा-मस्ती करतात. खाणं-पिणं, नाचणं-गाणं आणि फोटो काढण्याची मजा असते. अशात सर्वात जास्त फोटो काढले जातात ते नवरी-नवरदेवाचे. कारण त्यांच्यासाठी हा दिवस यादगार असतो. पण लग्नाच्या स्टेजवर असेच यादगार फोटो काढत असलेल्या फोटोग्राफरला नवरदेवाच्या रागाच्या सामना करावा लागला. हा क्षण असा होता की, इतर सर्वांसाठी यादगार बनला.

लग्नाच्या स्टेजवर फोटोग्राफरच्या (photographer) वागण्याने हैराण झालेल्या नवरदेवाने त्याच्यासोबत असं काही केलं की, नवरी स्टेजवरच खाली पडून जोरजोरात हसू लागली. तिचं हे हसणं पाहून सोशल मीडियावरील लोक लोटपोट होऊन हसत आहेत. आणि ही मुलगी पागल असल्याचं म्हणत आहेत

-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------हा व्हिडीओ ट्विटरवर रेणुका मोहन नावाच्या एका यूजरने शेअर केला. या व्हिडीओच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, 'आय जस्ट लव दिस ब्राइड! 

या व्हिडीओत बघू शकता की, हार घालण्यापूर्वी कपलचे सिंगल फोटो घेतले जात आहेत. फोटोग्राफर (photographer) पुन्हा पुन्हा नवरीच्या हनुवटीला हात लावून तिला बरोबर पोज देण्यास सांगत आहे. नवरदेव बाजूला उभा राहून हे सगळं बघत आहे. हे पाहून तो संतापतो आणि फोटोग्राफरच्या पाठीवर एक धपाटा देतो.

नवरदेवाचं हे रूप पाहून नवरी स्टेजवरच सर्वांसमोर जोरजोरात हसू लागते. तेच फोटोग्राफरला काही समजलं नाही आणि तो सुद्धा या गमतीत सहभागी होऊ हसू लागतो. पण या व्हिडीओत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते नवरीच्या लोटपोट होऊन हसण्याने. ती कशाचाही विचार न करता लोटपोट होऊन हसत आहे.

काही तासांपूर्वी पोस्ट झालेला हा व्हिडीओ (Video Viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ हजार लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आणि ८०० वेळा रिट्विट केलं आहे.