महापालिकेच्या दर रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. ९२ व्या रविवारी झालेल्या महास्वच्छता (Hygiene) अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्या रविवारपासून शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली. या मोहिमेचे सर्वच क्षेत्रांतून कौतुक झाले. विशेष म्हणजे सामाजिक संघटना, संस्था यांनी सहभाग नोंदविला. डॉ. कलशेट्टी यांच्या बदलीनंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ही मोहीम सुरू ठेवली आहे.

रविवारी झालेली स्वच्छता मोहीम ९२ वी ठरली. यावेळी स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर, वृक्षप्रेमी संस्था यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, स्वरा फाउंडेशनचे प्राजक्ता माजगावकर, डॉ. अविनाश शिंदे, आयुष शिंदे, विश्वजित पाटील, सनमेश कांबळे, अमृता वास्कर, आदी उपस्थित होते.

स्वच्छता केलेला परिसर

डी मार्ट ते फुलेवाडी मेनरोड, कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा जेल रोड, क्रीडा संकुल ते पद्मावती मंदिर रोड, रिलायन्स मॉल मागील बाजू संपूर्ण, पंचगंगा घाट संपूर्ण परिसर, शेंडापार्क ते सायबर चौक, कावळा नाका ते शिरोली नाका, महावीर कॉलेज ते डीएसपी चौक परिसर महापालिकेची यंत्रणा