life insurance LIC


लाईफ इन्शुरन्स (life insurance) कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी पॉलिसीधारकांसाठी एक खूशखबर आहे. कारण सरकार या पॉलिधारकांसाठी १० टक्के प्रस्तावित आयपीओ राखीव ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे पॉलिसीधारकांना एलआयसीचे भागीदार मालक बनण्याची संधी मिळणार आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता नियंत्रण विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी म्हटलं, “एलआयसीचे आयपीओ बाजारात आणताना कायद्यात आम्ही पॉलिसीधारकांसाठी काहीतरी ऑफर देणार आहोत. पॉलिसीधारकांना (life insurance) आम्ही भागधारक होण्याची संधी देणार आहोत. म्हणजेच त्यांच्यासाठी आम्ही १० टक्क्यांपर्यंत आपीओ ऑफर करु शकतो”

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

१९९१ नंतर सार्वजनिक क्षेत्राचा विचार केल्यास केंद्राचा सध्याचा निर्णय हा सर्वात मोठी सुधारणा आहे. आपल्याकडे २००४ मध्ये याबाबत धोरण होतं मात्र ते विशिष्ट प्रकरणांवर आधारित होतं. मात्र, पहिल्यांदाच आपल्याला संपूर्ण नॉन स्ट्रॅटेजिक सेक्टर उपलब्ध झालं आहे. जसं की तुमच्याकडे स्टील सेक्टर आहे ते पूर्णपणे खासगीकरणासाठी उपलब्ध आहे, असंही पांडे यांनी म्हटलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या बजेटमध्ये एलआयसीचे आयपीओ पुढील आर्थिक वर्षात बाजारात आणणार असल्याची घोषणा केली. सन २०२२ मध्ये यातील निर्गुंतवणुकीद्वारे १.७५ लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची केंद्राची योजना आहे.