investment schemes moneyऑनलाइन टिम :

केंद्र सरकारने (central government) डझनभर बचत आणि पेन्शन योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता. सरकारद्वारे जारी केल्यामुळे या योजना रिस्क फ्री असतात. म्हणजेच यामध्ये गुंतवणुकदारांचे पैसे बुडण्याचा धोका नसतो. सरकारने जारी केलेल्या गुंतवणूक योजनांमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, अटल पेंशन योजना, गव्हर्मेंट सिक्युरिटीज, सॉवेरियन गोल्ड बाँड, नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट यांचा समावेश आहे. यामध्ये गुंतवणूक (investment schemes) करुन आपण टॅक्स देखील वाचवू शकता. 2021 साठी असणाऱ्या 5 सर्वोत्कृष्ट गव्हर्मेंट सेव्हिंग स्किम्सबद्दल जाणून घ्या.

गव्हर्मेंट सिक्युरिटीज (G-Sec) -

गव्हर्मेंट सिक्युरिटीज (G-Sec) हा मार्केटमध्ये उपलब्ध असलेला सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. सॉवेरियन गॅरंटीमुळे गव्हर्मेंट सिक्युरिटीज धोक्यापासून सावध राहणाऱ्या गुंतवणूकदारांना खूप जास्त आकर्षित करतात. पण कमी धोक्यामुळे गव्हर्मेंट सिक्युरिटीजकडून रिटर्न्स कमी मिळते. गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये कॅश मॅनेजमेंट बिल्स (सीएमबी), ट्रेजरी बिल्स (टी-बिल्स), डेटेड गव्हर्मेंट सिक्युरिटीज आणि राज्य विकास कर्ज (एसडीएल) यांचा समावेश आहे. केंद्र सरकारद्वारे मनी मार्केट इंस्ट्रुमेंटच्या रुपाने टी-बिल्सला शॉर्ट टर्मसाठी जारी केले जाते. ज्याचा मॅच्युरिटी कालावधी 1 वर्षापेक्षा (साधारणत: 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस) कमी असतो.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना -

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना हा सरकारचा एक टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. टर्म प्लॅनचा अर्थ हा होतो की पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर ही इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्सची रक्कम भरते. जर पॉलिसीधारक जीवन ज्योती विमा योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जिवंत असेल तर त्याला कोणाताही फायदा मिळणार नाही. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा कालावधी फक्त एका वर्षाचा असतो आणि प्रत्येक वर्षी त्याचे नूतनीकरण केले जाते. जर एखाद्या व्यक्तीचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. त्यासाठी त्याला 330 रुपये वर्षाला द्यावे लागतात. या योजनेचा लाभ 18 ते 50 वयोगटातील कोणताही भारतीय नागरीक घेऊ शकतो.

सॉवेरियन गोल्ड बॉन्ड -

फिजिकल गोल्ड खरेदी केल्यानंतर तुम्ही सॉवेरियन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. त्याचे बरेच फायदे आहेत. सॉवेरियन गोल्ड बाँडमध्ये इश्यू प्राइजवर प्रत्येक वर्षाला 2.50 टक्के निश्चित व्याज मिळते. हे पैसे दर सहा महिन्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात. फिजिकल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफवर (Gold ETFs) याच पद्धतीचा फायदा मिळू शकतो. सॉवेरियन गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी पीरिअड 8 वर्षांचा आहे. पण गुंतवणूकदाराची इच्छा असल्यास 5 वर्षांनंतर यातून बाहेर पडणे शक्य आहे. याव्यतिरिक्त हा बाँड एनएसईवर देखील ट्रेड होतो. जर गोल्ड बाँडच्या मॅच्युरिटीवर कोणता कॅपिटल गेम्स होत असेल तर यावर सूट देखील मिळते.

----------------------------

सुकन्या समृद्धी योजना -

केंद्र सरकारने ही योजना लहान मुलींचे भविष्य सुधारण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेअतंर्गत केलेल्या गुंतवणुकींना (investment schemes) इनकम टॅक्स सेक्शन 80-C अंतर्गत सूट मिळते. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये फक्त 250 रुपयांमध्ये अकाउंट उघडता येते. म्हणजे तुम्ही दिवसाला 1 रुपया देखील वाचवत असाल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये 7.6 टक्क्याच्या दराने व्याज दिले जाते. यात मुलीच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी 50 टक्क्यांपर्यंत रक्कम काढली जाऊ शकते. ही योजना 21 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी किंवा त्यांच्या लग्नाआधीपर्यंत आहे.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड -

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) भारतामध्ये उपलब्ध असलेल्या सर्वात लोकप्रिय दीर्घकालीन कर्ज गुंतवणुकींपैकी एक आहे. पीपीएफचा सर्वात मोठा फायदा हा आहे की हा गॅरंटीड टॅक्स फ्री रिटर्न देतो. जे तुम्हाला एनपीएस, म्युचुअल फंड यासारख्या अन्य दीर्घकालीन मुदतीच्या गुंतवणूकीत मिळत नाही. पीपीएफमध्ये दर वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर इनकम टॅक्स कायद्यांच्या कलम 80-C अंतर्गत टॅक्स सूट आहे. 

पीपीएफमध्ये मिळविलेले व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम दोन्हींवर टॅक्स सूट मिळते. सब्सक्राइबर्स पीपीएफ अकाऊंटवर उपयुक्त व्याज दरावर कर्ज घेऊ शकतात. हे खासकरुन त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना अल्पकालीन मुदतीच्या कर्जासाठी अर्ज करायची इच्छा आहे. सेल्फ इम्प्लॉयड प्रोफेशनल आणि EPFO मध्ये न येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीपीएफ गुंतवणूकीचा पर्याय सर्वात फायदेशीर आहे.