Bigg Boss 14 winnerentertainment news- ‘बिग बॉस 14’च्या  ( Bigg Boss 14 ) फिनालेला अगदी काही दिवस उरलेत.  शो अंतिम टप्प्यावर आला आहे. रूबीना दिलैक, अभिनव शुक्ला, अली गोनी आणि राहुल वैद्य हे तगडे स्पर्धक विजयाचे दावेदार मानले जात आहेत. साहजिकच यापैकी कोण बिग बॉसची (reality show)  ट्रॉफी जिंकणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे. विजेत्याचे नाव जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत आणि आश्चर्य म्हणजे, गुगलने हे काम आधीच केलेय. होय, गुगलने ‘बिग बॉस 14’चा विजेता आधीच ठरवला आहे. 

काही तासांपूर्वी गुगलवर  Bigg Boss 14 Winner Name सर्च केल्यास रिझर्टमध्ये रूबीना दिलैकचे नाव दिसले. तर रनरअपमध्ये राहुल वैद्यचे नाव झळकले. फिनालेआधीच गुगलने ‘बिग बॉस 14’ रिझल्ट जाहीर केलेला पाहून चाहत्यांमध्ये उत्साह संचारला, हे सांगायला नकोच. रूबीनाचे चाहते तर अक्षरश: आनंदाने उड्या मारू लागलेत. अर्थात काहींनी रूबीनाला विजेता पाहून नाराजीही व्यक्त केली. गुगलच्या ‘बिग बॉस 14’ रिझल्टचा सोशल मीडियावर बोभाटा होताच, नंतर विकीपीडियाने हे आपले पेज एडिट केले. (entertainment news)

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------


प्रेक्षकांचे मानाल तर राहुल वैद्य या सीझनचा विजेतापदाचा सर्वात मोठा दावा आहे. प्रेक्षकांना त्याचा गेम चांगलाच आवडला आहे. अभिनव शुक्ला ज्या प्रगल्भतेने हा गेम खेळला, तेही लोकांना आवडले आहे. रूबीनाची फॅनफॉलोइंग मोठी आहे. अशात या तिघांमधून एकजण विजेता बनेल, असा कयास वर्तवला जात आहे. मास्टरमाइंड विकास गुप्ता बिग बॉसच्या (reality show)घरातून बाहेर पडल्यावर राहुल, अभिनव, रूबीना, राखी सावंत, अर्शी खान, निक्की तंबोली आणि एजाज खानची प्रॉक्सी म्हणून आलेली देवोलीना भट्टाचार्जी शोमध्ये उरले आहेत. प्रेक्षक आपआपल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करताना दिसत आहेत.