Gold Silver Price Today


अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी (Gold Silver Price Today) मोठे चढउतार पाहायला मिळालेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यानं आणि लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील सोन्या-चांदीवरही त्याचा परिणाम होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात सोने प्रतितोळा 490 रुपयांनी महागले असून, चांदीसुद्धा प्रतिकिलो 3200 रुपयांनी महाग झालीय. (Gold And Silver Price Hike By Rs 3,200, Read Today’s Rates)

अर्थसंकल्पाची सोन्या-चांदीलाही झळ बसल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय.सोने-चांदीचे भाव वाढल्यानं पुन्हा एकदा ग्राहकांचा सोन्याकडचा कल काही प्रमाणात कमी झालाय. पण येत्या काळात सोन्याच्या दरात घसरण होण्याचा अंदाजही तज्ज्ञ वर्तवतायत.


मुंबईतील सोने-चांदीचे दर (Gold Silver Price Today


22 कॅरेट सोने : 48,450 रुपये
24 कॅरेट सोने : 49,450 रुपये
चांदीचे दर : 73000 रुपये (प्रतिकिलो)



सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता


देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत.


अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित


तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो.