gold silver rate today

सोने खरेदीमध्ये (gold silver rate today) जगभरात भारतात मोठा ग्राहक आहे. भारतात सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. ऑगस्ट 2020 पासून सोन्याच्या दरात घसरण सुरु असून अद्यापही घसरण सुरुच आहे. ऑगस्ट 2020 मध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56 हजार 200 रुपये होता. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळात सुरक्षीत गुंतवणूक म्हणून सोन्याकडे (gold silver rate today) पाहिले गेले. सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून लोकांच्या मनातून कोरोनाची भीती निघून गेली आहे. त्यामुळे लोक सुरक्षित गुंतवणूक (investment) म्हणून सोने खरेदी करण्यास फारसा रस दाखवत नाहीत. गुंतवणूकदार आता शेअर बाजाराकडे वळले असल्याने येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकता. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 42 हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.

-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

पुढील 15 दिवस सोन्याच्या दरात घसरण सुरुच राहणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी सोन्यावरील सीमाशुल्कात कापत केल्याची घोषणा केली. यानंतर दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत एक हजार रुपयांनी स्वस्त झाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजारांवर आली आहे. तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, सोन्याच्या किमती घसरण्याचा कल पुढील 15 दिवस सुरु राहील, मात्र, दिवाळी पर्यंत सोन्याचे दर 50 हजारापर्यंत पोहचतील.

यामुळे सोने स्वस्त होत आहे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क कमी केले. या अर्थसंकल्पात सोने चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या सीमा शुल्क 12.5 टक्के आहे. यापूर्वी जुलै 2019 मध्ये शुल्कामध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली. त्यानंतर सोन्या चांदीच्या दरात झपाट्याने वाढले होते.