Gold silver Price Today


आता लग्नसराईचे दिवस सुरू होतील आणि सोनं-चांदी खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi commodity exchange) आज सकाळी सोनं (Gold silver Price Today) आणि चांदीच्या (Silver Price Today) किमती कोसळल्या आहेत. MCX वर सोन्याचा मार्चमधील फ्युचर ट्रेडमध्ये 39.00 रुपयांची घट होऊन तो 47,217.00 रुपयांवर ट्रेड होत होता.

तर चांदीच्या मार्चच्या फ्युचर ट्रेडमध्ये 130.00 रुपयांची घट होऊन तो 68,608.00 रुपयांवर ट्रेड होत होता. गेल्या सहा सत्रांपैकी 5 सत्रांमध्ये सोन्याची किंमत कमी झाली आहे. ऑगस्ट 2020 मधील विक्रमी उच्च दर 56 हजार 200 रुपये होता तो आता 9 हजार रुपयांनी घसरला आहे.

---------------------------------

Must Read

1) आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली आज भव्य मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ

2) ...अन्यथा कोल्हापूरचा वणवा राज्यभर पेटेल

3) Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हे' फंडे वापराल तर नकाराचं टेंशन विसराल....

---------------------------------

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही विक्रीचा ट्रेंड -

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची विक्री  (Multi commodity exchange)  सुरूच आहे. सोमवारी अमेरिकेत सोन्याच्या दरात 2.92 डॉलरची घसरण होऊन ते 1,811.22 डॉलर प्रति औस या दरावर विकलं जात होतं. चांदीत मात्र 0.003 डॉलरची तेजी होती आणि त्याचा दर 26.94 डॉलर होता.

राजधानी दिल्लीतील सोन्याचे भाव -

- 22 कॅरेट सोन्याचा का भाव - 46220 रुपये

- 24 कॅरेट सोन्याचा का भाव - 50420 रुपये

- चांदीचा भाव - 68700 रुपये

घसरणीचं कारण काय?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये सोन्या-चांदीच्या (Gold silver Price Today)  आयातीवरील शुल्कात 5 टक्क्यांची कपात केली आहे. सध्या 12.5 टक्के असलेलं आयात शुल्क आता 7.5 टक्के झालं आहे त्यामुळे दरातही घसरण झाली आहे.

अशी तपासा सोन्याची शुद्धता -

'BIS-Care app' या सरकारी अपचा वापर करून ग्राहक (Consumer) सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) तपासू शकतात. हे अप (App) वापरून अशुद्ध सोनं किंवा सोन्याशी संबंधित तक्रारही करू शकता.