gang rapecrime news- खारघरमध्ये राहणार्‍या एका १९वर्षाच्या तरुणीला तिच्या ओळखीच्या दोघा तरुणांनी हळदीच्या कार्यक्रमात कोल्ड्रिंक्समधून दारु पाजून तिच्यावर सामुहिक बलात्कार (gang rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील एका तरुणाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसर्‍या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

यातील पिडित तरुणी व अत्याचार करणारे दोघे आरोपी हे सर्व खारघरमधील एकाच भागात राहणारे आहेत. ते या तरुणीच्या ओळखीचे आहेत. पिडित तरुणी रहात असलेल्या भागात एका घरात हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी ही तरुणी आईवडिलांसह हळदीच्या कार्यक्रमासाठी गेली होती. यावेळी पिडित तरुणीला तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी गेली असताना आरोपींनी तिला जवळच असलेल्या बसमध्ये नेऊन कोल्ड्रिंक्समध्ये दारु मिसळून तिला पिण्यासाठी दिले़. 

-------------------------------

Must Read

1) अभिमानास्पद !!! इचलकरंजीच्या कन्येने पटकावला देशात प्रथम क्रमांक

2) अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वाद पेटला

3) दहावी- बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेआधीच खुशखबर !!!!

-------------------------------

त्यामुळे पिडित तरुणी बेशुद्ध झाल्यावर त्यांनी बसमध्येच तिच्यावर आळीपाळीने बलात्कार (gang rape) केला. त्यानंतर तिला अंधारात तळोजा भागात निर्जनस्थळी नेऊन सोडले. तरुणी अचानक कोठे गेली याचा शोध सुरु करण्यात आल्यावर ही तरुणी तळोजा परिसरात आढळून आली. तिच्याकडे आईवडिलांनी चौकशी केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी खारघर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद देण्यात आली आहे.