girl-sexually-assaulted-in-train-case-registered-in-thane


ऑनलाइन टिम :
Crime News-धावत्या एक्स्प्रेस रेल्वे गाडीत एका मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual harassment) करण्यात आल्याची धक्कादायक (Shocking) घटना समोर आली आहे. गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये बुधवारी तरुणीवर अत्याचार केल्याची घटना ठाणे स्थानकावर घडली आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे लोहमार्ग पोलीस करणार आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलगी आणि आरोपी हे दोघेही परिचित आहेत. दोघेजण गोरखपूर एक्स्प्रेसने प्रवास करत होते. मुलगी त्याच्यासोबत रेल्वेने प्रवास करत होती. जेव्हा गाडी ठाणे स्टेशनवर आली तेव्हा मुलीवर अत्याचार (Sexual harassment)  करण्यात आला.
----------------------------
टीसीने मुलीला तिकीट नसल्याने गाडीतून उतरविले आणि आरोपी हा पुढे निघून गेला. त्यानंतर ही घटना तेव्हा उघडकीस आली. त्यामुळे टीसीने मुलीच्या पालकांना संपर्क साधून बोलावले आणि त्यांच्या हवाली केले. पीडित मुलीने (victim girl) घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला आणि कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हा गुन्हा नंतर ठाणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे रेल्वे पोलीस करणार आहेत. तूर्तास मुलीची वैद्यकीय (medical) तपासणी सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.