Gasoline prices rise again in Yashhar


 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today) सातत्याने वाढ (Increase) होत आहे. ऐन महागाईत (Inflation) गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वावही वाढत आहे. आजही देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरात (rate) 30 ते 35 पैशांपेक्षा वाढलं आहे. 

खरंतर, तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी (Continued) करतात. त्यानुसार आज सलग 11 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. दिल्लीत 31 पैसे वाढीसह 90.19 वर पोचलं तर मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.62 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच मेट्रो शहरांमध्ये इंधनाच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं आहे.

----------------------------

दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दरांनी कहर केला आहे. शुक्रवारी दिल्लीतल्या अनेक शहरांमध्ये 30 ते 35 पैशांनी इंधनामध्ये (Petrol Diesel Price Today) वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, गुरुवारी कोलकातामध्ये पेट्रोल 91.41 लिटर भाव आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर आज दिल्लीत डिझेल 80.60 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात असून मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 87.62 तर कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 84.19 रुपये आहे.