molestation case against bjp leaders


मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (molestation) करण्यात आला आहे. यात भाजप पदाधिकाऱ्यासह 4 जणांचा समावेश आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शहडोल जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष कमल प्रताप सिंह यांनी या प्रकरणी विजय त्रिपाठी हे नाव समोर आल्यानंतर त्याला तात्काळ जैतपूर मंडळाच्या अध्यक्ष पदावरून हटवलं आहे. पक्षातील त्याचं प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे असंही म्हटलं जात आहे.

अतिरीक्त पोलीस अधीक्षक मुकेश वैश्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिला जैतपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात असलेल्या गाडाघाट परिसरातील फार्म हाऊसमध्ये घेऊन गेले. याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तरुणीला जबरदस्तीनं दारू पाजली आणि 18 व 19 फेब्रुवारी रोजी तिच्यावर बलात्कार (molestation) केला. या घटनेनंतर 20 फेब्रुवारी रोजी आरोपींनी तिला गंभीर अवस्थेत तिच्या घरासमोर फेकून दिलं आणि निघून गेले. यानंतर पीडितेनं 4 जणांविरोधात तक्रार दाखल केली.

----------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

या प्रकरणातील आरोपी विजय त्रिपाठी, मुन्ना सिंह, राजेश शुक्ला आणि मोनू महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे चारही आरोपी फरार आहेत. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत दरम्यान पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विजय त्रिपाठीची पक्षातून हाकालपट्टी केल्यानंतर जिल्हाध्यक्षकांनी अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजपला गरज नाही. अशा गुन्ह्याचा आणि कृत्याचा भाजप तीव्र निषेध करतो असं सांगितलं आहे.