Samsung Galaxy S21 Ultra 5G


सॅमसंग कंपनीने (samsung mobile) गेल्या महिन्यातच आपला प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S21 Ultra 5G लाँच केला होता. आता लाँचिंगच्या अवघ्या एका महिन्यातच कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे हा फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. पण किंमतीतील कपात मर्यादित कालावधीसाठीच असणार आहे.

अ‍ॅमेझॉनच्या ‘Fab Phones Fest’ सेलमध्ये हा फोन 24 हजार रुपयांच्या भरघोस डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. अ‍ॅमेझॉनवर ‘Fab Phones Fest’ सेल आजपासून सुरू झाला असून 25 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू असेल. सेलमध्ये Samsung Galaxy S21 Ultra 5G या फोनवर 24 हजार रुपये डिस्काउंट दिलं जात आहे. 

---------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

कंपनीने 1 लाख 5 हजार 999 रुपयांमध्ये Samsung Galaxy S21 Ultra 5G हा फोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटसह लाँच केला होता. मर्यादित कालावधीसाठी 24 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह हा फोन 81 हजार 999 रुपयांत खरेदी करता येईल.  मात्र फोनच्या 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिअंटवर किती डिस्काउंट मिळेल याबाबत अद्याप अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर किंमत अपडेट झालेली नाही.

Samsung Galaxy S21 Ultra 5G स्पेसिफिकेशन्स :-

Samsung Galaxy S21 Ultra 5G फोनमध्ये 6.8 इंचाचा डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये exynos 2100 प्रोसेसर असून इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. गॅलेक्सी एस21 अल्ट्रामध्ये 12 जीबी रॅम आणि 16 जीबी रॅमसोबत अनुक्रमे 256 जीबी व 512 जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय मिळतो. नावानुसारच हा फोन 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. या फोनची (samsung mobile) खासियत म्हणजे मागील बाजूला असलेला 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा. 108 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसोबत मागील बाजूला 10 मेगापिक्सेल ऑप्टिकल टेलिफोटो लेन्स, 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 10 मेगापिक्सेल ऑप्टिकल सुपर टेलिफोटो लेन्स आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 40 मेगापिक्सेलचा सेल्फी सेन्सरही मिळेल. याशिवाय अँड्रॉइड 11 वर कार्यरत असलेल्या या डिव्हाइसमध्ये 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरीही आहे.