ऑनलाइन टिम :

 Crime News-कार खरेदीचा बहाणा करुन फसवणूक केल्याप्रकरणी एकाला गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आय 20 चारचाकी गाडी खरीदी देतो, असे सांगून डॉ. रणजीत बाबासाहेब सावंत (रा. उचगाव ) यांच्याकडून पाच लाख रुपये त्या व्यक्तिने घेतले. मात्र चारचाकी गाडी त्यांना दिली नाही म्हणून फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी मयुर मधुकर पाटील (वय ३० रा.मणेरमळा उचगाव ) याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने (court) दि. २५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

----------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

सद्दाम खुदबुद्दीन जमादार व मयुर मधुकर पाटील तसेच सचिन सातकर ( तिघेही रा. मणेरमळा) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्ह्याची नोंद (Crime record)  गांधीनगर पोलिसांत झाली होती. डॉ. रणजीत सावंत यांना आय ट्वेन्टी चारचाकी MH09 FJ 0717 गाडी दाखवून विक्री करायची आहे, असे सांगून त्यांच्याकडून तिघांनी पाच लाख रुपये घेतले. मात्र गाडी दिली नाही  (Fraud). अधिक तपास गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार विराज डांगे करीत आहेत.