ऑनलाइन टिम :

आयपीएलमध्ये देशभरातील (IPL) तरुण खेळाडूंना संधी मिळते. अनुभवी खेळाडूंच्या बरोबर खेळल्याने त्यांना मोठा फायदा होतो. परंतु मोठ्या प्रमाणात पैसा (Money) आणि प्रसिद्धी (Fame) मिळत असल्याने ही लीग अनेकदा वादात देखील सापडली आहे. काही वर्षांपूर्वी स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणाने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं होतं. यामुळं काही खेळाडूंना जेलची हवा देखील खावी लागली होती. यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंचा समावेश होता. याचबरोबर अनेक खेळाडू विविध कारणांसाठी जेलमध्ये (jail) गेले आहेत.

या खेळाडूंना विविध कारणास्तव खावी लागली आहे जेलची हवा

1) एस श्रीसंत, अंकित चव्‍हाण आणि अजित चंडीला

2013 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) या तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या तिन्ही खेळाडूंना यामुळं पाच दिवस जेलची हवा देखील खावी लागली होती. 40 हजार कोटी रुपयांच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात या तीघांचा समावेश असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यामध्ये या तिन्ही खेळाडूंना प्रति ओव्हरसाठी 60 लाख रुपये देण्यात आले होते. चंडीलाबाबत अशी माहिती समोर आली होती की, त्याने इशारा न दिल्यानं त्याच्याकडं पुन्हा पैश्यांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात 2015 मध्ये तिघांनांही निर्दोष घोषित करण्यात आलं होतं.

----------------------------

2) राहुल शर्मा आणि वेन पार्नेल 

2012 मध्ये पुणे वॉरीअर्स (PWI) या टीमकडून खेळताना या दोघांना अटक करण्यात आली होती. मॅचनंतर झालेल्या एका पार्टीत या दोघांनी ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मुंबईमधील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत ड्रग्जचे सेवन करण्यात आल्याचा आरोप या दोघांवर करण्यात आला होता. यामध्ये या दोघांबरोबरच आणखी 86 जणांवर देखील 1200 पानाचं चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं. दोघांनीही सर्व आरोप फेटाळळे होते. पार्नेलबरोबर एका बर्थडे पार्टीत गेल्याचं राहुल म्हणाला होता. त्यांनतर झालेली चाचणीत या दोघांनीही ड्रग्ज घेतल्याचं समोर आलं होतं. परंतु पार्नेल यानं आपण केवळ दारू पिल्याचं म्हटलं होतं.

3) ल्‍यूक पोमर्सबाख

त्याच सीझनमध्ये आरसीबीचा (RCB) खेळाडू असणाऱ्या ल्युक (Luke Pomersbach) ला देखील अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या एका महिलेनं आपलं लैंगिक शोषण (harassments) केल्याचा आरोप त्याच्यावर केला होता. यामध्ये त्याने महिलेच्या बॉयफ्रेंडला मारहाण केल्याचं समोर आलं होतं. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि आरसीबीच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. घटनेत त्याच्यावर कलम 354, 323, 454 आणि 511 अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यामध्ये दोघांनीही कोर्टाच्या बाहेर हे प्रकरण मिटवल्याने त्याची सुटका करण्यात आली होती.

4) तुषार अरोठे

बडोदयाकडून सर्वात जास्त फर्स्ट क्लास मॅच खेळलेल्या तुषार अरोठे याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाबविरुद्धच्या (KXIP) मॅचमध्ये फिक्सिंगप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याबरोबर अन्य 18 जणांना देखील अटक करण्यात आली होती. पण त्यांनी आपल्यावरील हे आरोप खोडून काढले होते. अटकेनंतर (jail) त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं. परंतु त्याने हे आरोप खोटे असल्याचं वारंवार सांगितलं आहे.

5) नयन शाह

महाराष्ट्राच्या या तरुण खेळाडूला फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सट्टेबाजांना पिचची माहिती देण्यासाठी त्यानं 15 लाख रुपये घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. यामध्ये त्याने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअमवर रमेश कुमार नावाच्या व्यक्तीला पिचमध्ये छेडछाड करण्यासाठी नियुक्त केल्याचं देखील समोर आलं होतं. पाणी टाकून पीच स्लो करण्यासाठी त्यानं त्याला 5 हजार रुपये दिल्याचं देखील उघड झालं होतं. याचबरोबर अनेक तरुण खेळाडूंना मॅच फिक्सिंगमध्ये ओढण्याचं कामदेखील नयन करत असल्याचं समोर आलं होतं.