ऑनलाइन टिम:
Crime News-दारु पिऊन (Drinking alcohol) आलेल्या पुत्राशी वादाचे रूपांतर झटापटीत होवून पित्याच्या हातून चाकूने भोसकून तरुण मुलाचा खून झाल्याची खळबळजनक घटना काल मध्यरात्री शुक्रवारी जळगाव शहरातील बालाजी पेठेत घडली आहे. संशयित वडील स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झालेत. सौरभ सुभाष वर्मा (वय २६) असे खून (Murder) झालेल्या तरुणाचे नाव आहे.सौरभ सुभाष वर्मा आपल्या दोन भाऊ आणि आई-वडिलांसह जळगावातील बालाजीपेठ परिसरात राहत होता.
सौरभला दारूचे व्यसन (Drinking alcohol) होते. दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. नेहमीप्रमाणे काल शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री साडेअकरा वाजता सौरभ दारू पिऊन घरी आला. त्यामुळे सौरभ आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद सुरू झाले. वाद इतके विकोपाला जावून त्याचे रूपांतर झटापटीत झाले. यात सौरभ हातातील चाकू काढून वडिलांना धमकावत होता.
----------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष रविवार,14 फेब्रुवारी २०२१..!!
2)इचलकरंजी युवकावर खूनी हल्ला...!!
3)कोल्हापुरात 100 एकरमध्ये आयटी पार्क उभारणार : उद्योगमंत्री..?
संतप्त झालेल्या वडिलांनी सौरभच्या हातातील चाकू (Knife) हिसकावून त्याला दम दिला. सौरभ वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला असता वडिलांच्या हातातील चाकू सरळ सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यात सौरभ गंभीर जखमी झाला. तातडीने त्याल जिल्हा रुग्णालयात (hospital) हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे स्वत:हून शनिपेठ पोलीस ठाण्यात हजर झाले. या प्रकरणी संशियत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.