Queues of vehicles for fastagऑनलाइन टिम :

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गा वरील किणी टोल नाक्यावर सर्व वाहनांसाठी आज मध्यरात्रीपासून फास्टॅग अनिवार्य (Fastag mandatory) करण्यात आले, फास्टॅग नसणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल आकरल्यामुळे वादावादी होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिवसभर दिसत होते.

गेली वर्षभर फास्टॅग बसविण्याच्या हालचाली सुरू आहेत, विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे तसेच टोल नाक्यावरही फास्टॅग असणाऱ्या वाहनांसाठी वेगळ्या रांगा व कॅशसाठी वेगळ्या रांगा ठेवल्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचन्याबरोबरच इंधनाची बचत होत आहे. टोल नाक्यांवरील (toll booths) गर्दी कमी करण्याचा उपाय म्हणून फास्टॅगकडे (Fastag) पाहिले जात आहे. 

----------------------------

Must Read

------------------------------

विविध माध्यमातून जनजागृती (Awareness) करूनही अद्याप तीस टक्के वाहनधारकानी फास्टॅगकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे दिसत असून आता मात्र आता राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाके  (toll booths)  कॅशलेस करण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने १ जानेवारीस सुरवात फास्टॅग सक्तीसाठी (Fastag mandatory)  निवडली होती , मात्र पुन्हा ही मुदत १५ फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली आतापर्यंत किणी टोल नाक्यावरील आठ लेन पैकी फास्टॅग असणाऱ्या वाहनांसाठी सहा रांगा व फास्टॅग नसणाऱ्या वाहनांसाठी दोन रांगा राखीव ठेवण्यात आल्या होत्या.

फास्टॅग नसणारे वाहन फास्टॅगच्या रांगेमध्ये आल्यास त्यांचेकडून दुप्पट टोल वसूल करण्याच्या सूचना शासनाने दिल्याने त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती,मात्र आज मध्यरात्रीपासून टोल नाक्यावरील सर्वच रांगा फक्त फास्टॅग वापरणाऱ्या वाहनांसाठी करण्यात आल्या, मध्यरात्री टोल नाक्यावरील कर्मचारी विना फास्टॅग वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल करत असल्याने वाहनधारक व टोल कर्मचारी यांच्यात वादावादी होत होती.वाहनधारक व टोल कर्मचारी यांच्यात वाद होऊन वाहतूक खोळंबू लागली यामुळे दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते. आज पुणे येथील युवकांनी टोल देण्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना दुपारी घडल्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.