raju shetti


politics news- सरकारला खूश करण्याच्या भानगडीत पडू नका, नाही तर एक दिवस तुमचे तुणतुणे बंद पडायला वेळ लागणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या समर्थनार्थ ट्वीट (twitter tweet) करणाऱ्या सेलेब्रिटींना दिला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनास (farmer protest) पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात मोठी झटापट झाली. यावेळी ते बोलत होते.

सरकारचे समर्थन करणाऱ्या सेलिब्रिटींना इशारा देताना शेट्टी म्हणाले, 'तुम्ही सरकारचे लाभार्थी असल्याने त्यांना खूश करण्यासाठी सरकारचे समर्थन करत असाल, पण अशा भानगडीत तुम्ही पडू नका. आपल्या नावामागे सेलिब्रिटी (twitter tweet) म्हणून शेपूट आहे, ते केवळ कोट्यवधी लोकांचे प्रेम आहे म्हणून आहे. हे लोक आता केंद्राच्या विरोधात आहेत. तुमच्या विरोधात जायला त्यांना फार वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच शहाणे व्हा'.

-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

पोपटाचा जीव कशात आहे, हे आम्हाला माहीत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष केले जात आहे, ते पाहता आता सरकारची कोंडी करण्याची वेळ आली आहे. यामुळे सरकारचा महसूल थांबवण्यासाठी प्रसंगी आम्ही जीएसटी भवनला घेराव घालण्यात येईल, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला.