farm laws


केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात (farm laws) अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन ( farmers protest ) सुरू आहे. या आंदोलनामुळे आता भाजपमधील अस्वस्थता ( amit shah ) समोर आली आहे. हे आंदोलन जाट विरुद्ध इतर होऊ नये? अशी भीती पक्षाच्या रणनीतिकारांना आहे. तसे झाल्यास पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट बहुल १९ जिल्ह्यांतील ५५ विधानसभा मतदारसंघाच्या जागा पक्षासाठी आव्हान ठरू शकतात. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमनाची योजना बनवणाऱ्या योगी सरकारच्या अडचणी वाढू शकतात.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे मुख्य रणनीतिकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम उत्तर प्रदेशसह हरयाणामधील ४० जाट नेत्यांची दोन दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक घेतली होती. जाट नेत्यांनी घरी बसू नये. रस्त्यावर उतरा आणि खाप पंचायतींमध्ये जाऊन शेतकरी कायद्यांच्या बाजूने वातावरण निर्माण करून जाट मतदार दूर होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना अमित शहांनी दिल्या.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

शेतकरी आंदोलनाने होणाऱ्या नुकसानीची घेतली माहिती

पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रमुख जाट नेते आणि बागपतचे खासदार सतपाल सिंह, मुझफ्फरनगरचे संजीव बलियान, गाझियाबादचे माजी नगराध्यक्ष आशु वर्मा, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष राजा वर्मा, नरेश सिरोही यांना अमित शहांनी बैठकीसाठी बोलावले होते. एक एक करून शहांनी शेतकरी आंदोलन (farm laws ) आणि पक्षाला झालेल्या नुकसानीबाबतची माहिती घेतली.

पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समाजाचे आमदार आणि खासदार यांच्यावर अमित शहा नाराज होते. कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवर ते आपली बाजू ठोसपणे मांडत नाहीए. तसंच त्यांच्या उलट सुलट वक्तव्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. यामुळे पूर्ण विचार करून बोला, अशी सूचना अमित शहांनी जाट नेत्यांना दिली.