exam preparationeducation news- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे (exam preparation) अर्ज भरून घेण्यात आले असून, दोन्ही वर्गातील सुमारे 32 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, राज्यातील कोरोना अद्याप संपला नसल्याने एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीप्रमाणे ठरलेल्या केंद्रांवर घेणे अशक्‍य मानले जात आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रे वाढतील असा अंदाज आहे. तीन किलोमीटरच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रे असणार आहेत. 

कोरोनाची (coronavirus) स्थिती सावरत असतानाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. आता कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्याने शाळाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे परीक्षा घेण्यास काही हरकत नाही, असे पुणे बोर्डाचे मत आहे. दरम्यान, कोरोनाची संभाव्य स्थिती विचारात घेऊन परीक्षांचे नियोजन केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.

---------------------------------

Must Read

1) आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली आज भव्य मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ

2) ...अन्यथा कोल्हापूरचा वणवा राज्यभर पेटेल

3) Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हे' फंडे वापराल तर नकाराचं टेंशन विसराल....

---------------------------------

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार 25 टक्‍के अभ्यासक्रम वगळून प्रश्‍नपत्रिका तयार केल्या जाणार आहेत. परीक्षेसह अन्य अडचणींसंदर्भात विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन तथा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून कोरोनाची भीती दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परीक्षांचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाईल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षा केंद्रे वाढणार की नाहीत, पूर्वीच्याच परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे, याबद्दल या विभागाने काहीच घोषणा केलेली नाही. 

  • 23 एप्रिल ते 29 मे या वेळेत होणार बारावीची परीक्षा; जुलैअखेर लागणार निकाल 
  • दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मेपर्यंत; ऑगस्टअखेर निकालाची शक्‍यता 
  • विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तीन किलोमीटरच्या परिसरात असणार एक परीक्षा केंद्र 
  • विद्यार्थ्यांच्या सोयीच्या ठिकाणीच परीक्षा केंद्रे 

दहावी- बारावीच्या परीक्षांचे (exam preparation) वेळापत्रक यापूर्वीच निश्‍चित झाले असून विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्जही भरून घेण्यात आले आहेत. पुणे बोर्डाच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील शाळा व त्या ठिकाणच्या आसन क्षमतेची माहिती सादर केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची सोय होईल, अशा ठिकाणीच दरवर्षीप्रमाणेच परीक्षा केंद्रे असतील त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.