Nilesh Rane attacks on Ajit Pawarpolitics in india- माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. देशात मोगलाई आहे का या अजित पवारांच्या सवालावरुन निलेश राणेंनी निशाणा साधला. “अजित पवारांना महाराष्ट्रात मोगलाई आहे का असं म्हणायचं होतं, चुकून देशात म्हणाले, हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असं होतं”, असं ट्विट (twitter tweet) निलेश राणे यांनी केलं. इतकंच नाही तर “परवा भाषणात कुठेतरी मी अनेकवेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही असंही अजित पवार म्हणाले, याला चिंधी विचार म्हणतात साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला”, असा घणाघात निलेश राणे यांनी केला. (Nilesh Rane attacks on Ajit Pawar)

-------------------------------

Must Read

1) अभिमानास्पद !!! इचलकरंजीच्या कन्येने पटकावला देशात प्रथम क्रमांक

2) अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वाद पेटला

3) दहावी- बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेआधीच खुशखबर !!!!

-------------------------------अजित पवार काय म्हणाले होते? 

अजित पवार काल अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का”, असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला. (politics in india)

दोन दिवसापूर्वी अजित पवार इंदापुरात होते. अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेंच्या नुतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) उपस्थित होते. अजित पवारांनी यावेळी बोलताना भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..? असा टोला हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता लगावला. तर इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला. तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही. बँक चालवता येत नाही.काय चाललंय, असा सवाल अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना केला.