ऑनलाइन टिम:
Accident News-भरधाव कार दुभाजकावर आदळली सांगली राज्यमार्गावर पुलाची शिरोलीजवळ चालकाचा ताबा सोडून कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन (Friends) मित्रांचा मृत्यू झाला. करण रमेश पोवार (वय २७, रा. ताराराणी कालनी ,छ .संभाजीनगर ) व सूरज पाटील (२७, रेसकोर्स नाका , छ .संभाजीनगर ) अशी मृतांची नावे व सूरज सदाशिव आहेत. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला,करण पोवार व सूरज पाटील हे शुक्रवारी रात्री जयसिंगपूर येथील काम आटोपून कोल्हापूरकडे येत होते.
रात्री साडेअकराच्या सुमारास हालोंडी गावच्या हद्दीत असणाऱ्या टोल नाक्याच्या दुभाजकावर भरधाव कार आदळली. डोक्याला गंभीर दुखापत (Serious injury) झाल्याने करण पोवार याचा जागीच मृत्यू (Death) झाला तर सूरज पाटील याचा शनिवारी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे करण आणि सूरज लहानपणीचे मित्र (Friends) आहेत.
----------------------------
Must Read
1)आजचे राशीभाविष रविवार,14 फेब्रुवारी २०२१..!!
2)इचलकरंजी युवकावर खूनी हल्ला...!!
3)कोल्हापुरात 100 एकरमध्ये आयटी पार्क उभारणार : उद्योगमंत्री..?
संभाजीनगर येथे एकाच परिसरात राहत होते. तसेच ताराराणी मित्र मंडळामध्येही दोघे सक्रिय होते.नोकरीला लागण्यापूर्वीच.करणचे वडील कोल्हापूर महापालिकेत नोकरीला होते. कोरोना काळात सेवा बजावताना त्यांचा ऑनड्युटी मृत्यू (Death) झाला. त्यांच्या जागी करणला नोकरी लागावी, यासाठी पोवार कुटुंबाने महापालिकेला पत्रव्यवहारही केला होता. पण पाटील कुटुंबीयांनी एकुलता व कर्ता मुलगा गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
बंद टोल नाका आणखी ग किती बळी घेणार?
हालोंडी गावच्या हद्दीत असणारा टोल नाका गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. या बंद टोल नाक्यामुळे आणखी किती जणांना आपला जीव गमवावा लागणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दीड वर्षांपूर्वीच याच ठिकाणी दुचाकी दुभाजकावर आदळून तरुण जागीच ठार झाला होता. हा टोल हटवणे गरजेचे आहे.