Driyashyam


अमेझॉन प्राइमने (amazon prime) मल्याळी सुपरस्टार मोहनलाल याचा आगामी चित्रपट 'दृश्यम २'चा ट्रेलर अखेर रिलीज झाला. खरं तर हा ट्रेलर ८ फेब्रुवारीला रिलीज होणार होता. पण त्याआधीच हा ट्रेलर ऑनलाइन लीक झाल्यानं अमेझॉन प्राइमनं रिलीज डेटच्या दोन दिवस आधीच हा ट्रेलर रिलीज केला. असं म्हटलं जात आहे की, अमेझॉन प्राइमवर चुकून हा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. मात्र काही वेळातच हा ट्रेलर डिलिट करण्यात आला. पण तोपर्यंत तो कॉपी केला गेला होता आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जॉर्ज कुट्टी (मोहनलाल)आणि त्यांचं कुटुंब दाखवलं आहे. जे त्या सर्व समस्यांमधून बाहेर आले आहेत. जे मागच्या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. जॉर्ज कुट्टी यांनी आता एक थिएटर खोललं आहे आणि आता त्यांना एक चित्रपट प्रोड्युस करायचा आहे.


------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------

मात्र त्यांची पत्नी राणी (मीना)या गोष्टीमुळे नाराज आहे की, तिचा पती त्याच्या आयुष्याची सर्व कमाई त्याच्या स्वप्नांसाठी खर्च करेल. तिला आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे. इतक्यात पुन्हा एकदा हे संपूर्ण कुटुंब पोलिसांच्या चौकशीमध्ये फसतं. जो मुलगा मेलेला असतो तो जॉर्ज कुट्टी यांच्या मुलीचा मित्र असल्याने या कुटुंबाची चौकशी सुरू होते. आता जॉर्ज कुट्टी आपल्या कुटुंबाला कशाप्रकारे वाचवतो हीच चित्रपटाची कथा आहे.

या चित्रपटाचा पहिला भाग २०१३ मध्ये रिलीज झाला होता. ज्यावर २०१५ मध्ये निशिकांत कामत यांनी याचा हिंदी रिमेक तयार केला होता. ज्यात अजय देवगणसोबत श्रीया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. याशिवाय या चित्रपटाचा तमिळ रिमेक सुद्धा बनवला गेला आणि प्रत्येक भाषेत या चित्रपटाचा प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. आता मल्याळममधील हा 'दृश्यम २' येत्या १९ फेब्रुवारीला अमेझॉन प्राइमवर (amazon prime) रिलीज होणार आहे.