Dog fightऑनलाइन टिम :

इचलकरंजी :भटक्या कुत्र्यांनी मांडलेल्या उच्छादाच्या घटना ताज्या असतानाच रविवारी रात्री येथील नाईक मळा, संत मळा व तांबेमाळ परिसरात भटक्या कुत्र्यांनी दहशत (Panic) निर्माण करत दहा ते पंधरा जणांचा चावा घेतला. या घटनेमुळे सुमारे पन्नासभरने युवक व नागरिकांनी लाठ्या काठ्या घेऊन या भटक्या कुत्र्यांच्या टोळीचा पाठलाग केला.कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी (Injured) सिराजबी साहेबलाल बाळवेकर (वय ७५), महादेवी राजराम हडपद (वय ६०), जीवन श्रीकांत ठाणेकर (वय ३२) व मृणाली प्रदीप उबाळे (वय १४) यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये तर उर्वरित नागरिकांवर खाजगी रुग्णालयांमध्ये  (private hospitals) उपचार (Treatment) करण्यात आले.यामध्ये एक वृद्ध महिलेसह अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. 

सदर घटनेची माहिती आरोग्य सभापती संजय केंगार यांना समजल्यानंतर त्यांना हॉस्पीटलला भेट देऊन माहिती जाणून घेत उपचाराबाबत  (Treatment) सूचना दिल्या. दरम्यान, यातील वाळवेकर या वृद्धेला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर दाखल करण्यात आले आहे.शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत आहे. दुचाकी वाहन तसेच सायकलवरून जाणाऱ्यांचा पाठलाग करणेबरोबरच पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे तसेच चावणेच्या घटना घडत आहेत. रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांना चहाला जाण्यासाठीही मोकाट कुत्री आता अडचण ठरताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरावे लागत आहे. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रार (Complaint) करूनही अद्याप काहीच उपाययोजना झाल्या नाहीत.