Disha Patanientertainment news- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood actress) दिशा पाटनी (Disha Patani) तिच्या ग्लॅमरस लूकमुळे (Glamorous) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी काही ना काही शेअर करत असते. तिने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनावर छाप सोडली आहे. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर (instagram photo) केला आहे. जो वेगात व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री दिशा पाटनीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासातचं 15 लाखांहून अधिक जणांनी हा फोटो लाईक केला आहे. यावरुन दिशा पाटनीची सोशल मीडियावर तरुणांमध्ये असलेली क्रेझ लक्षात येऊ शकते. हा फोटो शेअर करताना दिशाने कॅप्शनमध्ये 'बीचची आठवण येत असल्याचं' लिहिलं आहे. तुम्ही फोटोत पाहू शकता, दिशा पांढऱ्या रंगांच्या बिकिनीवर (Glamorous) पोज देताना दिसत असून तिच्यासमोर निळ्याशार पाण्याने भरलेला अथांग समुद्र आहे.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट करून दिशाच्या सौंदर्याचं कौतुक  (instagram photo)  केलं आहे. दिशा पाटनीची बहिण खुशबू पाटनीही यामध्ये मागे राहिली नाही, तिने या पोस्टवर 'Wow ब्युटी' अशी कमेंट केली आहे. याशिवाय टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने 'नॅचरल ब्युटी' अशी कमेंट केली आहे.

दिशा पाटनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, दिशा अलीकडेच 'मलंग' या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटात ती आदित्य रॉय कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दिशा पाटनीचा 'राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत.