entertainment news-सध्या वेब सिरीज  (web series) पाहणारा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांनी डिजीटलकडे आपला मोर्चा वळवला आहे. आता दिग्दर्शक तेजस लोखंडे मालिकेनंतर डिजीटल क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याने नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. तसेच वेबसिरीजच्या शुटिंग दरम्यानचे फोटो तो सोशल मिडीयावर शेअर करताना दिसतो. 

या वेबसिरीजची निर्मिती 'चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट', 'चंद्रप्रकाश यादव' आणि 'प्रशांत सावंत' हे करत आहेत. तर शिवराज सातार्डेकर हे डिओपी आहेत. यातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. 

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

दिग्दर्शक 'तेजस लोखंडे' याने मराठी नव्हे तर हिंदी मालिकांचेही दिग्दर्शन केले आहे. त्याने आजवर अंजली, दुहेरी, नकळत सारे घडले अश्या लोकप्रिय मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तर सास बिना ससुराल, फिरंगी बहू, छन छन अश्या हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तेजसने मस्ती म्युझिक चॅनेलमध्ये 'चॅनेल दिग्दर्शक' म्हणून कार्यभारही सांभाळला आहे. तसेच त्याने ड्रिमींग ट्वेंटी फोर सेव्हन आणि ऑप्टिमिस्टीक्स अश्या बड्या प्रॉडक्शन हाऊसचे अनेक प्रोजेक्ट देखील केले आहेत. 

दिग्दर्शक 'तेजस लोखंडे' डिजीटल पदार्पणाविषयी सांगतो, ''मला वेबसिरीजचे (web series) दिग्दर्शन करण्याची इच्छा होती आणि त्याच दरम्यान माझ्याकडे सस्पेन्स थ्रिलरची स्क्रिप्ट आली आणि मी वेबसिरीज करण्याचे ठरवले.  तसेच शुटिंग दरम्यान मला नविन गोष्टी शिकता आल्या.''