ms dhoni dance video viral


ऑनलाइन टिम :

महेंद्रसिंग धोनीला त्याचे चाहते ‘कॅप्टन कूल’, 'थला’, ‘ माही भाई’ अशा वेगवेगळया नावांनी बोलावत असतात. आणि धोनी सुद्धा नेहमीच ‘ऑंन द फिल्ड’ असो किंवा ‘ऑफ द फिल्ड’ आपल्या वेगळ्या अंदाजाने नेहमीच त्याच्या चाहत्यांना खुश करत असतो. असाच धोनीचा एक डान्सिंग अंदाज नुकताच त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाला असून त्याला चाहत्यांची मोठी पसंतीही मिळते आहे. अगदी काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान (video viral on internet) व्हायरल झाला.

हा व्हिडीओ एका लग्न समारंभामधला आहे. धोनीने पत्नी साक्षीसह एका लग्नात हजेरी लावली होती. त्यात सगळे जण धमाल मस्ती करताना दिसत आहेत. तर MSD एका खुर्चीवर बसलेला असून पत्नी साक्षीसोबत ‘मे तेरा' या गाण्यावर थिरकताना दिसतो आहे. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत धोनीला अशा अंदाजात पाहून खूप छान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.--------------------------

IPL 2020 संपल्यापासून धोनी स्पर्धात्मक क्रिकेट पासून दूर आहे. तो नुकताच काही जाहिरातींच्या शुटिंगसाठी आणि काही फंक्शनमध्येमध्ये हजेरी लावताना दिसून आला होता. आयपीएल संपल्यापासून धोनी दुबईमध्ये होता आणि तो खेळापासून दूर होता. यापूर्वी धोनी मुंबईमध्ये अ‍ॅड शुटसाठी शहरात आला होता. अगदी व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी) रोजी चॅरिटी फुटबॉल सामन्यामध्ये सुद्धा त्याने सहभाग घेतला होता.

धोनीची पत्नी साक्षी नेहमी तिच्या इंस्टाग्रामवर त्याचे व्हिडीओ (video viral on internet)  अपलोड करत असते. लाडक्या MSD ची एक झलक पहायला मिळावी म्हणून धोनीचे फॅन्स साक्षीलाही फॉलो करत असतात.

धोनी आता पुन्हा एकदा IPL 2021 मध्ये त्याच्या चाहत्यांना चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद भूषवताना दिसून येईल.