Dhananjay Munde case filed again


कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार (molestation)  मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार (Complaint) केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी  त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहेत. शिवाय, पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

करुणा यांनी पोलीस आयुक्ताकड़े दिलेल्या अर्जामध्ये माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत. मला त्यांच्याशी भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बँगल्यावर जाताच,  मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले.  बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात.  


-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे  चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आजाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दया. आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

कोण आहे करुणा ?

मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण (molestation) समोर आल्यानंतर  आपली भूमिका मांडली आहे. त्यात करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.

करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी (inusrance policy) आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत. मात्र २०१९९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. असे नमूद केले होते.