ऑनलाइन टिम :
यावेळी त्याने आरडाओरड केल्यावर परिसरातील शेतमजूर धावून आले. नवे दानवाड, टाकळीवाडी, दत्तवाड या तीन गावांच्या सीमेवर शेत आहे. त्यामुळे गावापासून लांब असणाऱ्या या शेतात घटना घडल्यानंतर नागरिकांनी धाव घेतली. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, वनविभागाचे (Wildlife) वनपाल घन:शाम भोसले, वनरक्षक गजानन सकट यांनी भेट देऊन पंचनामा करून वन्यप्राण्यांच्या पायाचे ठसे घेतले. यावेळी दत्तवाडचे पोलीस पाटील संजय पाटील, प्रकाश तिप्पाणावर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Must Read
1) आजचे राशीभाविष सोमवार,15 फेब्रुवारी २०२१..!!
2) इचलकरंजीचे श्रीमंत घोरपडे नाट्यगृह दुरवस्थेत..!!
3) धावत्या रेल्वेत ओळखीच्या व्यक्तीनेच केला मुलीवर अत्याचार..!!
येथील चिगरे ओढ्यात (stream) नवे दानवाड येथील शेतकरी, ग्रामस्थांकडून मृत झालेली लहान-मोठी जनावरे, कोंबड्या याठिकाणी टाकण्यात येतात. त्यामुळे या परिसरात कुत्र्यांचा (Dogs) वावरही मोठा आहे. मात्र, या कुत्र्यांनी माणसांवर यापूर्वी कधीही हल्ला केलेला नाही. मात्र, तीन आठवड्यांपूर्वी लगत असणाऱ्या दत्तवाड हद्दीमध्ये यल्लवा वडर या महिलेवर देखील हल्ला होऊन तिचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हा हल्लादेखील त्याच वन्यप्राण्याने केला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.