नव्या कृषी कायद्यांविरोधात (agriculture law) शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस दिल्लीतील वातावरण तणावपूर्ण होताना दिसत आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या तथाकथित हिंसेनंतर शेतकरी आंदोलन आणखी तीव्र झालं असून, आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारनं ठिकठिकाणी नाकेबंदीचं जाळं अंथरलं आहे. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी तिरंग्याचा अपमान केल्यावरूनही आरोप होत असून, पंतप्रधान मोदी यांनीही याबाबत दुःख व्यक्त केलं होतं. त्यावरून शिवसेनेनं टीकेचा बाण डागत सवाल उपस्थित केला आहे.
राष्ट्रध्वजाच्या अपमानावरून सत्ताधारी भाजपाकडून (political party) होत असलेल्या आरोपांचा शिवसेनेनं अग्रलेखातून समाचार घेतला आहे. त्याचबरोबर 'मन की बात'मधून तिरंग्याच्या अपमानाबद्दल दुःख व्यक्त करणाऱ्या पंतप्रधानांही सवाल केला आहे.
------------------------------------
Must Read
1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची
2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....
3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर
-------------------------------------
"तिरंगा अपमानित करून कोणतेही आंदोलन चालणार नाही. प्रश्न इतकाच आहे, जो अपमान झालाय असे दिसत नाही त्यावर पंतप्रधानांनी इतके व्यथित का व्हावे किंवा सत्ताधारी पक्षाने इतकी आदळआपट का करावी? पंतप्रधान मोदी यांच्या भावना देशाला समजल्या आहेत व आता आंदोलक शेतकऱ्यांचे (agriculture law) म्हणणे ऐकून घ्या, इतकेच मागणे आहे.
शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करा व तिरंग्याचाच मान राखा असे सांगणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही! हातात व ट्रक्टरवर तिरंगा लावूनच शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावर तडफडून मरू देणे हा तर तिरंग्याचा भयंकर अपमान आहे. तिरंग्याच्या रक्षणासाठी जवानांची फौज सीमेवर प्राणांची बाजी लावत आहे. त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांची पोरं मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचे बळी घेऊन तिरंग्याचा काय सन्मान राखणार आहात?," असं शिवसेनेनं म्हटलं आहे.